राजकीय

महिलांच्या नावावर सत्तेवर आलाय; त्यांचा सन्मान ठेवा!


महिलांच्या नावावर सत्तेवर आलाय; त्यांचा सन्मान ठेवा!महिलांच्या सन्मानासाठी भाजप महिला मोर्चाचा ; काँग्रेस भवनासमोर निदर्शने, आंदोलकांची अटक -सुटका!

 

बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

महिलांच्या सन्मानाच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेसने स्वतःच्या खासदाराशी संबंधित गंभीर प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी आज बेळगाव येथे काँग्रेस भवनासमोर भाजप महिला मोर्चाच्यावतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले, यावेळी आंदोलक आणि पोलिसात झटापट झाल्याचे दिसून आले. यावेळी आंदोलकांची अटक करून सुटका करण्यात आली.

 

जेनयूच्या प्रकरणावर स्पष्टीकरण द्या; आंदोलकांची मागणी! 

   JNU चे माजी प्राध्यापक आणि काँग्रेसचे लोकसभा खासदार अंगोमचा बिमोल अकोइजम यांच्याशी संबंधित प्रकरणात ११ विद्यार्थिनींनी तक्रारी केल्याचे वृत्त आणि विद्यापीठाने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करत भाजप महिला मोर्चाने,  काँग्रेस नेतृत्वाच्या भूमिकेबाबत यावेळी जाब विचारला. तुम्हीं ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ अशी घोषणा देणाऱ्या काँग्रेसने आता महिलांच्या सन्मानाच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावी. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांनी या प्रकरणावर मौन न बाळगता जनतेसमोर उत्तर द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

राजकीय सोयीसाठी महिलांचा वापर करू नका! 

महिलांच्या हक्कांबाबत राजकीय सोयीनुसार भूमिका घेता कामा नये. महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि न्याय यांना पक्षीय राजकारणापेक्षा अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे. आरोपांची निष्पक्ष चौकशी आणि कायदेशीर प्रक्रियेचा आदर राखतानाच, महिलांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहणे,  ही प्रत्येक राजकीय पक्षाची नैतिक जबाबदारी आहे. राज्य भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत,  डॉ.भस्मे, अध्यक्ष, बेळगाव ग्रामीण महिला मोर्चा; शिल्पा केकरे, अध्यक्ष, बेळगाव शहर महिला मोर्चा; उज्वला बदवानाचे, सुनीता पाटील तसेच महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *