उद्योग

हब्बनहट्टीसारख्या ठिकाणी बॉक्साइट राजरोस चालते तर, खानापुरात वाळू, विट व्यवसाय का? चालत नाही!


भूगर्भ, पोलिस आणि तहसीलदार खात्याचा दूजाभाव का? ; बेळगावात एक तर खानापूर तालुक्यात वेगळा नियम का? 

 

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

आख्या जिह्यात वाळू, विट व्यवसायासह इतर धंदे सुरळीत सुरू असताना, खानापुरातील अशा व्यवसायांवर बंदी का? खानापुरातच हब्बनहट्टीसारख्या लॅट्रॉईट नावे राजरोसपणे बॉक्साइट चालते तर मग याच तालुक्यात वाळू,विट व्यवसायांवर आडकाठी का? आणली जात आहे. असा प्रश्न तालुक्यवासीयांतून विचारला जात आहे.

 

ॲड. ईश्वर घाडी, प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाळू, विट व्यावसायिकांची बैठक; सोमवारी आंदोलनाचा इशारा!

बेळगावसह, खानापुरच्या पश्चिम भागात अवैध धंदे चालतात तर मग, वाळू विट व्यवसाय का? चालत नाहीत असा सवाल विचारत आज खानापुरातील वाळू,विट व्यावसायिकांची बैठक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात पार पडली. ॲड ईश्वर घाडी आणि माजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाळू विट व्यवसायांवर चर्चा करण्यात आली, बेळगांव तालुक्यासह इतर ठिकाणी असे व्यवसाय जोरात चालतात तर मग खानापुरात वेगळा कायदा कसा? याचे उत्तर भूगर्भ,पोलिस आणि तहसीलच्या अधिकाऱ्यांनी द्यावे, असा प्रश्न अँड ईश्वर घाडी यांनी बोलतांना विचारला आहे. माजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी बोलतांना, तालुक्यात वाळू विट व्यवसाय बंदीमुळे हजारो शेतकरी बांधव अडचणीत आले आहेत, शेतीबरोबर वाळू आणि विट व्यवसाय जोड धंदा म्हणून केला जातो. मात्र, यंदा अपुऱ्या पावसाअभावी शेती गेली, परिणामी दुष्काळ पडला आहे, त्यात जोड धंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळू, विट व्यवसायांवरही बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे आम्हीं करायचे तरी काय? असा गंभीर प्रश्न उपस्थित केला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायक मुतगेकर यांच्यासह तालुक्यातील वाळू , विट व्यावसायिक उपस्थित होते.


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *