हब्बनहट्टी श्री स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्रावर आज सायंकाळी आमदार विठ्ठल हलगेकर यांचा ‘विशाल’ दिपोत्सव!
अनेक मान्यवरांची उपस्थिती; धार्मिक कार्यक्रमानंतर, महाप्रसादाचे आयोजन….
हब्बनहट्टी:: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते श्री स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्रावर आज (सोमवार – 16 ) सायंकाळी विशालकाय दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यानिमित जिल्हा आणि तालुक्यातून महनीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 6.30 वाजता दिपोत्सव , 7 वा. महाआरती होणार आहे.
8 वाजता आमदारांचा भव्य सत्कार….
धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री 8 वा. लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांचा देवस्थान कमिटीच्यावतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे, त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर अध्यक्षस्थानी असतील. यावेळी इतरही सत्कार होतील…

संपादक : विलास गोविंद कवठणकर





