उद्योगराजकीय

ज्ञानेश कुमार हटाव; निवडणूक आयोग बचाव!


खानापूर ब्लॉक काँग्रेसची हाक; वोट चोर, ज्ञानेश कुमार गद्दार सारख्या घोषणांनी खानापूर शहर आणि तहसील कार्यालय दणाणून! 

 

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

देशात ठिकठिकाणी  केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधी पक्षांची जोरदार आंदोलने, निदर्शने सुरू आहेत, त्याचीच प्रचिती खानापुरातही आली, तालुका ब्लॉक काँग्रेसच्यावतीने काढलेल्या आंदोलनात ज्ञानेश कुमार हटाव आयोग बचाव अशा जोरदार घोषणांनी खानापूर शहर आणि तहसील कार्यालय दणाणून गेले होते. जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांना हटवण्यात येत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असाही इशारा यावेळी देण्यात आला. एआयसीसी सचिव तथा माजी आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला होता, यावेळी तशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ॲड . ईश्वर घाडी, महादेव कोळी, सुरेश जाधव, तोहिब चंदीनावर, अनिता दंडगल, दीपक कवठणकर, संजय गावडे यांच्यासह तालुक्यातील काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजीने शहर दणाणून गेले होते.


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *