उद्योगशिक्षण-प्रशिक्षण

विभागीय प्रतिभा कारंजी स्पर्धेत ; यजमान जांबोटी मराठी शाळेने 28 पैकी 22 ‘नंबर’ पटकावले!


शुक्रवारी जांबोटीत पार पडलेल्या  विभागीय 12 शाळांच्या कारंजी स्पर्धेत जांबोटी शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांची उत्तम कामगीरी!

 

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

विद्यार्थ्यांमध्ये लपलेल्या सुप्त अर्थात विविध कलांचे मुक्तपणे सादरीकरण करणे, कृतीतून प्रकट होणे यालाच प्रतिभा कारंजी अर्थात ‘कलेचे कारंजे ‘ उमटणे असे म्हणतात! दरवर्षी ही स्पर्धा राज्यभर भरविली जाते, मुलांच्या गुप्त गुणांना मुक्तपणे वाव मिळाला पाहिजे, त्यांच्यातील मूळ कला प्रकट झाली पाहिजे असाच शासनाचा उद्देश असतो. त्याच अनुषंगाने शुक्रवारी जांबोटी पूर्ण मराठी प्राथमिक केंद्र शाळेत आयोजित केलेल्या विभागीय प्रतिभा कारंजी स्पर्धेत यजमान जांबोटी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेने 28 पैकी 22 क्रमांक पटकावले आहेत. त्यावरून येथील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेत कमालीची भर पडल्याचे स्पष्ट होत आहे. जांबोटी सीआरपी विभागातील एकूण 12 शाळांमध्ये ही स्पर्धा झाली तर त्यामध्ये पाच पूर्ण प्राथमिक शाळांचा समावेश होता.

 

मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन; शुभारंभ!

भाजप युवा नेते दौलत कोलीकर, कालमणी शाळेचे माजी शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष कृष्णा भरणकर, सीआरसी विठोबा दळवी, युवा नेते यशवंत पाटील, आमटे शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष संतोष गुरव, माजी सीआरसी रमेश गावडे, कन्नड शाळेचे मुख्याध्यापक पत्तार सर, आमगाव शाळेचे एन. ओ. बालेकुंद्री, जांबोटी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष महेश जांबोटकर, उपाध्यक्ष विलास कवठणकर, सदस्य संतोष कुर्लेकर, विनायक कोटीभास्कर, संतोष शिंदे आदी मान्यवरांच्याहस्ते कार्यक्रमाचे दीप्रज्वंलन व शुभारंभ करण्यात आले.

 

गुणवंतांचा गौर -सत्कार….

जांबोटी मराठी शाळेचे नूतन मुख्याध्यापक डी. पी. पाटील, सहाय्यक शिक्षिका व्ही. पी. घाडी, माजी सीआरसी मुख्याध्यापक रमेश गावडे, हब्बनहट्टी मराठी शाळेचे मुख्याध्यापक कोराणे सर, सहशिक्षक संभाजी सावंत व त्यांचे सहकारी, कन्नड शाळेचे मुख्याध्यापक पत्तार सर, चिरेखनी शाळेचे उत्कृष्ट अतिथी शिक्षक रमेश पाटील, आमटे पूर्ण प्राथमिक मराठी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष संतोष गुरव, भाजपा युवा नेते दौलत कोलीकर, कालमणी शाळेचे माजी शाळा सुधारणा अध्यक्ष कृष्णा भरणकर यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौर-सत्कार करण्यात आला आला. तसेच सर्व शाळाच्या मुख्याध्यापक सहसिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.

 

मान्यवरांचे विचार…

सीआरसी विठोबा दळवी, माजी सीआरसी मुख्याध्यापक रमेश गावडे, जांबोटी शाळा सुधारणा कमिटीचे उपाध्यक्ष विलास कवठणकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. जांबोटी मराठी शाळेचे मुख्याध्यापक डी. पी. पाटील यांनी स्वागत केले तर सहशिक्षक एम. एन. कालमनकर यांनी आभार मानले.

 

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *