उद्योगमहत्त्वाचे

एसी कार्यालयात लोकायुक्त धाड! शुभम अप्पाराव’ने ‘केला’ एसडी ‘पद्माकर’ पाटील यांचा ‘गेम ‘ !


30 हजाराची होती मागणी, त्यामधील 2 हजार घेतांना अडकला; जिल्हा लोकायुक्त एसपी प्रसन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली; एसी कार्यालयात एकच खळबळ…

 

बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

बेळगांव जिह्यातील महसूल खात्यात चालणारे गोंधळ दिवसेंदिवस वाढतच चालले, पण कमी होण्याचे नाव घेईनात. आज असाच एक प्रकार घडला आहे, बेळगांव एसी कार्यालयातील एसडी (सहाय्यक) पद्माकर पाटील रंगेहाथ जिल्हा लोकायुक्त पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.  शुभम अप्पराव या शेतकऱ्याकडून शासकीय कामासाठी 30 हजारांची मागणी केली होती, त्याच दिवसांपासून सापळा रचण्यात आला, लागलीच शुभम यांनी लोकायुक्त पोलिसात रीतसर तक्रार केली, तेंव्हापासून पोलिसांनी आपली चक्रे फिरवत अखेर आज (मंगळवार दि.17) अडकलेच! त्यामुळे एसी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

 

कधी कमी होणार सरकारी ‘भ्रष्टाचार ‘ अन् सामन्यांची यातून सुटका कधी? होईल!

जिह्यात सर्वाधिक महसूल खात्यात अधिक प्रमाणात गैरव्यवहार होत असतो, गेल्या पाच वर्षात या कार्यालयावर शेकडो कारवाया झाल्या असून, त्यामध्ये अनेकजन निलंबित झाले आहेत, पण, तरीही या कार्यालयातील गोंधळ कमी होण्याचे नाव घेईना. कधी कमी होणार सरकारी ‘भ्रष्टाचार अन् सामन्यांची यातून कधी सुटका होईल असाच प्रश्न नागरिकांतून विचारण्यात येत आहे. नुकतेच एसी म्हणून पदभार स्वीकारलेल्या बसवराज नागराळ यांच्या काळातच लोकायुक्त कारवाई झाल्याने त्यांच्याकडेही संशयाची सुई फिरणार नाही म्हणून कशावरून? !

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *