Zp,TP चे आरक्षण जाहीर झाले, पण…?
खानापूर ZP,TP चे आरक्षण जाहीर झाले पण, हरकतीनंतर चित्र स्पष्ट!
10 दिवसांत (19 तारखेपर्यंत )नोंदवण्याचे आवाहन; त्यानंतरच होणार क्लिअर!
बेळगांव/ बंगळूर लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
खानापूर तालुक्यातील zP, TP निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले पण, हरकतीनंतरच चित्र स्पष्ट होणार असून, निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल. कारण, मागच्या पदांचा कार्यकाळ संपून मध्ये आणखी एक अधिक कार्यकाळ गेला आहे. तर याकाळातही आरक्षण जाहीर झाले होते पण, त्याविरोधात तक्रारींचा मुद्दा कोर्टात गेल्याने तब्बल एक कार्यकाळ अर्थात पाच वर्षे संपून, अधिक दोन वर्षे लोटली आहेत. त्यामुळे यावेळेचे आरक्षण हरकतीनंतरच खरे ठरणार आहे.
एकूण 6 जि. पं. जागांचे आरक्षण असे –
1) जांबोटी – सर्वसाधारण ( पुरुष).
2) गर्लगुंजी – सर्वसाधारण (महिला)
3) पारिश्वाड- अनुसूचित जाती (महिला).
4) कक्केरी – अनुसूचित जमाती ( महिला) .
5) नंदगड – मागासवर्गीय अ (महिला).
6) लोंढा – सर्वसाधारण (महिला).
तर तालुका पंचायतीच्या 20 जागांमध्ये सर्वसाधारण जागा अधिक आहेत…

संपादक : विलास गोविंद कवठणकर





