सामाजिक

सर्जाच्या उपचारासाठी आमदारांकडून शेतकऱ्याला आर्थिक मदत!


कुप्पटगीरीच्या शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार!

बैलाच्या पायाला दुखापत झाल्याने संबंधित शेतकरी अडचणीत होता!

कुप्पटगिरी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

बैलाच्या पायाला नाल मारताना दुखापत झाली होती, त्या समस्येने कुप्पटगिरी (ता.खानापूर) येथील रवळू शंकर पाटील यांच्या शर्यतीच्या बैलाला नाल मारतांना दुखापत झाली होती. ते वृत्त आमदार विठ्ठल हलगेकर यांना कळताच, त्यांनी भाजपा जिल्हा रयत मोर्चा उपाध्यक्ष तथा लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील यांच्याकरवी आर्थिक मदत धाडली. लागलीच श्री.पाटील यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सदर मदत संपूर्त केली. यावेळी शंकर पाटील, संभाजी पाटील, तानाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *