तुमच्यासाठी ‘तो उधळपट्टी उत्सव’ असेल ; पण, आमच्यासाठी काळा दिनच!
महाराष्ट्र एकीकरण सामीती आणि मराठी भाषिकांचे मत; उद्या काळा दीन, मराठी जणांनी बहुसंख्य उपस्थित राहण्याचे आवाहन..
बेळगांव: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर )
1956 साली झालेल्या भाषावार प्रांत रचनेत मराठी भाग असतांना, अन्यायाने बेळगांव, कारवार, बिदर, भालकीसह 856 गावांचा मराठी मुलुख मुद्दामहून केंद्र सरकारने (तात्कालीन म्हैसूर) अर्थात आताच्या कर्नाटक राज्यात डांबला. त्याचदिवशी कर्नाटक राज्याचीही स्थापना झाली पण, त्यादिवसापासून येथील मराठी भाषिकांतर्फे केंद्र सरकारचा निषेध न्यायालयीन मार्गाने, शांतेनेने 1 नोव्हेंबर काळा दीन म्हणून पाळला जातो, यादिवशी खानापूर बेळगावात सायकल फेरी, खानापूर येथील शिवस्मारकात दंडाला काळया फिती बांधून तालुका म. ए समितीच्यावतीने उपोषण केले जाते. त्याआधी शहरातून मुकमोर्चा काढला जातो. उद्या रविवार 1 नोव्हेंबर रोजी म.समितीकडून मूकमोर्चा, सायकल फेरी आणि उपोषणं केले जाणार आहे, तरी मराठी भाषिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन, तालुका म. ए समितीकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्योत्सवाच्या नावाखाली संपूर्ण राज्यातील कन्नडीग बेळगावात गोळा होवून मराठी भाषिकांना डीवचण्यासाठी मुद्दामहून धिंगाणा घालतात, तुमच्यासाठी तो उधळपट्टी उत्सव असेल पण, आमच्यासाठी तो काळा दिवसच अश्याच प्रतिक्रिया मराठी भाषिकातून व्यक्त होतांना दिसतात.
खानापूर म. ए समितीकडून जोरदार तयारी; मोठ्या संख्येने मराठी भाषिक उपस्थित राहणार…
यावेळी तालुका समितीकडून नियोजनबद्ध तयारी करण्यात आली असून, बहुसंख्येने तालुक्यातील मराठी भाषिक उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे सरचिनीस आबासाहेब दळवी यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली. समितीचे सर्व पदाधिकारी आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संपुर्ण तालुक्यात पत्रके वाटून जागृती करण्यात आली आहे, अलीकडच्या काळात मराठी’वर चालेल्या अन्यायामुळे खडबडून जागे झालेल्या मराठी भाषिकांनी समितीच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला आहे, त्यामुळे यंदा लक्षणीय काळा दीन होणार आहे.

संपादक : विलास गोविंद कवठणकर





