कोडगई’चा विकास घाई घाईत: आ. हलगेकर!
गावाला भेट देऊन नागरिकांकडून जाणून घेतल्या समस्या….
खानापूर:लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
तालुक्यातील कोड्गई गावाला भेट देत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी जाणून घेतल्या समस्या, आमदार गावात येतात असे समजताच गावकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन गावच्या समस्या सांगितल्या. या गावासाठी पाणी समस्या मोठी असून, ती तात्काळ सुटली तर हे गाव एका मोठ्या समस्येतून मुक्त होईल, अशी आशा गावकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली, त्यावर आमदारांनी या समस्येसह गावच्या इतर समस्याही अगदी घाई घाईत सोडवू अशी हमी दिली. ग्रामीण भागातील दौरा विकासाच्या दृष्टीने मोलाचा असल्याचे पुढे बोलतांना आमदारांनी स्पष्ट केले. यावेळी आमदारांचे कार्यकर्ते, शेकडो गावकरी उपस्थित होते…

संपादक : विलास गोविंद कवठणकर





