सामाजिक

अवजड वाहतुकीमुळे हब्बनहट्टी रस्ता खड्ड्यात!


अवजड वाहतुकीमुळे हब्बनहट्टी रस्ता खड्ड्यात; पालकमंत्र्यांकडे तक्रार!

10 ते 12 टन वजनाचा रस्ता असताना 40 ते 50 टन वाटलुकीला कोणी दिली परवानगी; याची चौकशी करण्याची मागणी!

 

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

आधीच रस्त्याची दुर्दशा आणि त्यात गेल्या सहा महिन्यांपासून हब्बनहट्टीत सुरू असलेल्या बॉक्साइट अवजड वाहतुकीमुळे हब्बनहट्टी रस्ता खड्ड्यात गेला आहे. याला जबाबदार कोण? 10 ते 12 टन वजनाचा रस्ता असताना त्यावरून 40 ते 50 टनाची अवजड वाहतूक सुरू आहे, यांना कोणी परवानगी दिली. तात्काळ याची चौकशी करा अशी मागणी भागातील नागरिकांनी आज खानापुरात पार पडलेल्या प्रजा सेवा आंदोलन कार्यक्रमात पालकमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली.

 

पीआरडी (रस्ते) खाते काय करते? ..

    जांबोटी ते चोर्ला मार्ग ते श्री स्वयंभू मारुती तीर्थक्षत्रापर्यंतचा रस्ता पीआरडी रस्ते खात्याकडे येतो. गेले सहा महिने बॉक्साइट सुरू असताना, या खात्याचे अधिकारी गप्प का? रस्ता पूर्णपणे बंद झाल्यानंतर हे खाते जागे होणार का? असा सवाल यावेळी नागरिकांनी केला. पीआरडी खात्याने तात्काळ याची चौकशी करून यावर बंदी घालावी अशी जोरदार मागणी केली. यावेळी भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी धनश्री सरदेसाई यांनी या समस्येबद्दल सविस्तर माहिती पालकमंत्र्यांना दिली.

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *