तालुक्यात 5 हजार गृहलक्ष्मी लाभार्थी कायद्याच्या अडचणीत ; लाभार्थींच्या अडचणी सोडवण्यास तालुका पंचहमी योजना ‘अध्यक्ष कुचकामी’ ठरलेत का? : राजू कांबळे!
जांबोटी प्रजा सेवा आंदोलन अपडेट भाग – 2
जांबोटी प्रजा सेवा आंदोलन कार्यक्रमात तालुका भीमसेना अध्यक्ष राजू कांबळे यांनी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, नवीन सिमकार्ड घ्यावेच लागणार…
जांबोटी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
राज्य सरकारच्या पाच योजनांपैकी महत्वाची योजना म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या गृहलक्ष्मी योजनेला भलत्याच्या कायद्याने, अडचणींनी पछाडले आहे. तालुक्यात 5 हजार मधील बहुतेक गृहलक्ष्मी लाभार्थी महिलांचे मानधन जीएसटी आयटी रिटर्न फाइलसह काही तांत्रिक अडचणी सापडले आहे. असे असतांना तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्या सोडवण्याबाबत कोणत्या योजना आखल्या आहेत, कधी या समस्या निकालात काढणार असे सांगतानाच, तालुका पंचहमी योजना अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांना भीम सेना अध्यक्ष राजू कांबळे यांच्याकडून चांगलेच फैलावर घेण्यात आले. तालुक्यातील गृहलक्ष्मी लाभार्थींच्या समस्या तुम्हीं सोडवत नसाल तर तुमचा उपयोग काय? या समस्या सोडवण्यास तुम्हीं अपयशी ठरला आहात? असा प्रश्न राजू कांबळे यांनी जांबोटीत शनिवारी पार पडलेल्या प्रजासेवा आंदोलन कार्यक्रमात आमदार, सर्व अधिकाऱ्यांसमोर केला. त्यावर कुलकर्णी यांनी तालुका अधिकाऱ्यांचीही भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला असता, त्यावरही आक्षेप घेत राजू कांबळे यांनी तुम्हीं का? बोलता, सीडीपीओ अधिकारी स्पष्टीकरण देऊ दे की अशी तंबी दिली. त्यानंतर सीडीपीओ अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, पण त्यातही तितका ठोसपणा दिसून आला नाही असे श्री. कांबळे यांचे म्हणणे आहे.
अनेकवेळा ऑफिसचे हेलपाटे मारूनही ही समस्या सुटेना; तुम्हीं करताय तरी काय?
माझ्या स्वतःच्या आईसह तालुक्यातील तब्बल 5 हजार गृहलक्ष्मी लाभार्थींचे मानधन जीएसटी आयटी रिटर्न फाइलसह काही काहीं तांत्रिक अडचणींमुळे अडकून पडले आहे. त्यावर तालुका पंचहमी योजना अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांची भूमिका मोलाची असताना त्यांनी याबाबत कोणत्या हलचाली करताना मला दिसले नाही, असे सांगतानाच मी अनेकवेळा तालुके सीडीपीओ कार्यालयाचे हेलपाटे मारूनही ही समस्या सुटत नाही. तर मग अध्यक्षांचा उपयोग काय? असा सवाल राजू कांबळे यांनी जांबोटी प्रजा सेवा आंदोलन कार्यक्रमात शेकडो महिला नागरिकांच्यासमोरच केला. माझ्या आईचे मानधन जीएसटी आयटी रिटर्न फाइलची समस्या दाखवून बंद करण्यात आले आहे, शिवाय अनेक महिलांना याच समस्येचा सामना करावा लागत आहे. मी यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे राज्य सरकारलेवल पुरवली असतांना अद्याप ही समस्या का? सुटली नाही. अशा समस्या, त्रुटी दूर करण्याचे काम तालुका पंचहमी योजना अध्यक्षांचे आहे, त्यानुसार प्रयत्न होतात का? असाही सवाल राजू कांबळे यांनी उपस्थित केला.
लवकरात लवकर लाभार्थी महिलांचे प्रश्न सोडवा: आमदार…
माझ्याकडेही लाभार्थी महिलांनी ही समस्या मांडली असून, ती गंभीर आहे. कारण, यातील जास्तीजास्त महिलांची आयटी रिटर्न फाइल असण्याचा प्रश्नच येत नाही, ही तांत्रिक अडचण आहे. ती तात्काळ दूर करून महिलांचा प्रश्न सोडवा अशी सूचना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी यावेळी केली.
गृहलक्ष्मी लाभार्थी महिलांना नवीन सिमकार्ड घ्यावेच लागणार!
सध्या काहीं तांत्रिक अडचणींमुळे गृहलक्ष्मी लाभार्थींचे मानधन अडकून पडले आहे, शिवाय यात काहीं सरकारला शंका,काही अडचणी दूर करायच्या आहेत, त्यासाठी खऱ्या लाभार्थींचा सर्वे केला जात आहे. त्यातून सरकारने एक उपाय काढला आहे, तो म्हणजे प्रत्येक लाभार्थी महिलांनी नवीन सिमकार्ड घेणे असा आहे. आजच्या प्रजा सेवेत नवीन सिमकार्ड घ्यावेच लागेल असा खुलासा अधिकाऱ्यांनी केला.

संपादक : विलास गोविंद कवठणकर




