क्राईम

खानापुर शहर आणि परिसरात धाब्यांबर दारूचा नंगानाच!


खानापुरात धाब्यांव’र दारूचा’ नंगानाच; पोलिस,अबकारी अधिकाऱ्यांना हप्त्यांचा स्वाद गोड गोड?…

जिल्हा पोलिस प्रमुखांचा आदेश धाब्यावर ; परिणामी शहरात गुन्हेगारी वाढण्याची सामान्यांना भीती, जिल्हा वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का?

 

खानापूर : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

खानापुरात शहरात चाललेय तरी काय? फक्त गुन्हेगारी! अशा बेकायदेशीर कृत्यांमुळे शहर वेठीस धरल्याचे चित्र आहे. कोण कुठे जागा बळकावून गोर गरिबांना त्रास देते तर कुठे सट्टे, जुगाराचे अड्डे शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण करतात. अलीकडे तर शहर आणि परिसरातील धाब्यांवर दारूचा नंगानाच सुरू आहे, तो वेगळाच! रात्रीप्रमाणे दिवसाढवळ्याही धाब्यांवर राजरोसपणे दारूची चलती सुरू असून, पोलिस आणि अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना हप्त्यांचा स्वाद अती गोड गोड येत असल्याची चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरू आहे. याकडे आता पोलिस आणि अबकारी खात्याचे जिल्हाअधिकारी तरी लक्ष देतील का? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

 

पोलिस आणि अबकारी अधिकाऱ्यांना वेगवेगळा हप्ता….

धाब्यांवर दारू विक्री करण्यास पूर्णपणे बंदी असून, कायदेशीर निर्बंध लावण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हा पोलिस प्रमुख रामराजन यांनी बजावला आहे. तरीही सदर आदेश धाब्यावर बसवून स्थानिक पोलिस अधिकारी आणि अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मोठ्या आशीर्वादाने धाब्यांवर राजरोसपणे दारूची विक्री सुरूच आहे. परिणामी यामुळे संपूर्ण शहर वेठीस धरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा या अवैध धंद्यांना रोखणार कोण? असा संतप्त सवाल शहरवासीयांतून केला जात आहे.

 

महिन्याला दोन हजार ते पंधराशे हप्ता??

स्थानिक माहितीनुसार पोलिस आणि अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना महिन्याला प्रत्येक धाब्यांकडून दोन हजार ते पधराशे दोन्हीं खात्यांना दिले जातात. ते दोन प्रकारात वाटले जातात अशी माहिती लोकहित न्यूज कडे उपलब्ध झाली आहे.

 

 

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *