क्राईम

गोवा वनखात्याची मोठी कारवाई; कर्नाटक, महाराष्ट्रातील 20 जणांना म्हादई जंगलात पकडले!


16 मोबाईल जप्त; गोवा जंगल हद्दीत का घुसले? यावरून कारवाई होण्याची शक्यता!

 

गोवा: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

गोवा वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली असून, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील 20 जणांना म्हादाई जंगलात पकडले आहे, त्यांच्याकडून 16 मोबाईल जप्त केले आहेत. गोवा शेजारील दोन्हीं राज्यातील हे युवक कसे आत घुसले, जंगलात त्यांनी का? प्रवेश केला यावरून मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

याआधीही अशा घटना घडल्या आहेत…

गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्हीं राज्यांची जंगल हद्द लागूनच असल्याने, या तिन्हीं राज्यातील पर्यटक या सर्व जंगल प्रदेशात घुसल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. त्यामुळे हे पर्यटक वा युवक मुद्दामहून जंगलात घुसतात की, चुकून याचाही विचार होणे अपेक्षित आहे. मागच्यावेळी कर्नाटकाच्या जंगलात गोव्याचे पर्यटक अडकले होते,त्यांना कर्नाटक वन अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून त्यांना सही सलामत शोधून काढले होते. त्यात आणखी एक बाब म्हणजे या तिन्हीं राज्यांच्या जंगलात घुसलेल्या व्यक्तींना घनदाट जंगलाचा अंदाज येत नाही, आत शिरल्यानंतर कोणीही फसू शकते अशी परिस्थिती आहे.


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *