सामाजिक

राज्य सरकाकडून महत्त्वपूर्ण निर्णय; 2, 500 रु मिळणार दुष्काळी मदत!


240 तालुक्यांपैकी 226 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित; त्यामध्ये 186 तालुके अती दुष्काळी तर 40 तालुके मध्यम, FRUITS ( app): सॉफ्टवेअर डीबीटीमार्फत जमा होणार रक्कम!

 

बेळगांव/ बंगळूर: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

यंदाची खरीप हंगाम परिस्थिती पाहता राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, लवकरच राज्यातील नुकसानग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 2, हजार 500 रु आपत्कालीन मदत म्हणून मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना कोणताही अर्ज करण्याची गरज नसून FRUIT (app) सॉफ्टवेअर डीबीटीमार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होणार आहे.

 

एकूण 240 तालुक्यांपैकी 226 तालुके दुष्काळग्रस्त, त्यामध्ये 186 दुष्काळग्रस्त तर 40 तालुके मध्यम दुष्काळ यादीत!

राज्यात एकूण 240 तालुक्यांपैकी 226 तालुक्यात नुकसान झाली असून, त्यामध्ये 186 तालुके अती नुकसानग्रस्त तर 40 तालुक्यांचा मध्यम दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला आहे. असे असले तरी राज्य सरकाकडून नुकसान झालेल्या सर्वच तालुक्यांना सदर आपत्कालीन आर्थिक मदत मिळणार आहे. नुकतेच केंद्रीय पथकाने राज्याचा पाहणी दौरा केला होता, त्यामध्ये राज्यात यंदा 35 टक्केच सरासरी पाऊस पडला असल्याने, पिकांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने मिळून आपत्कालीन आर्थिक मदतीची घोषणा केलेली असून, केंद्राकडून विलंब होतोय म्हणून राज्य सरकारने पहिला हप्ता स्वतः देण्याचे जाहीर केले आहे.


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *