सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रूग्णांची परवड; उपलोकायुक्त म्हणाले ‘हिस वेरी डेंजर’ ‘
औषधेही डेडबार, रुग्णांचा वेळेत उपचार होत नसल्याचे पाहणीतून स्पष्ट; कारभार सुधारा अन्यथा कारवाईला सामोरे जा – लोकायुक्त!
बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
राज्य उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांनी अचानक भेट दिल्याने जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमधील अनेक प्रकार समोर आले तर कारभारही उघड्यावर आला. सरकारी ‘दवाखान्यात दाद करत नाहीत ‘ अशी समजूत नागरिकांच्या मनात कायम घर करून बसली आहे, तरीही कोणी नाईलाजास्तव तिथे गेलाच तर त्याची वेळेवर दखल घेतली जात नाही, असाच प्रकार कालच्या लोकायुक्त पाहणीतून समोर आले. औषधे डेडबार, महील, दिव्यांगसह सामान्य नागरिकांची कशी? परवड होते, याचे जिवंत दृश्य लोकायुक्तांच्या समोर आले, तीन ठिकाणी तीन महिलांनी उघडपणे लोकायुक्तांकडे आपली हेळसांड कशी होते त्याचे कथन केले. त्यावर सोबत असलेल्या बिम्स संचालक आणि जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. मी अनेकवेळा दररोज हेलपाटे मारत आहे, पण माझी कोणी दखलच घेत नाही असे एका महिलेने रडून सांगितले.
दीस हिस वेरी डेंजर; कारभार सुधारा अन्यथा कारवाईला सामोरे – लोकायुक्त!
सिव्हिलमधील एका काउंटरवर तीन महिला थांबल्या होत्या, त्यावेळी लोकायुक्तांनी त्यांची विचारपूस केली असता, काय करणार सर याठिकाणी दखलच घेतली जात नाही तर आम्ही काय करू? असे उत्तर दिले. त्यावर लोकायुक्त न्यायमूर्ती बी.वीरप्पा यांनी सिव्हिल संचालक आणि जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे इशारा करत ‘दिस हिस वेरी डेंजर हा! कारभार सुधारा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला.
सर्व यंत्रणांची पाहणी; आरोग्य बाबतीत हलगर्जीपणा नको!
यावेळी लोकायुक्तांनी सिव्हिलच्या सर्व खोल्यातील यंत्रणांची पाहणी करून, अनेक रुग्णांची चौकशी केली. यावेळी बऱ्याच त्रुटी आढळून आल्या, त्यावर आरोग्य बाबतीत हलगर्जीपणा नको असा सज्जड दम लोकायुक्तांनी अधिकाऱ्यांना दिला.
जबाबदारी कुणाची ? संचालक – जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांचे एकमेकाकडे बोट!
एका समस्येबद्दल विचारण्यासाठी लोकायुक्तांनी जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांना बोलावले असता, त्यांनी सिव्हिल संचालकांकडे बोट केले, त्यावर संचालकांनी जिल्ह्याचे आरोग्याधिकारी कोण? असा प्रतिप्रश्न केला. त्यावरून दोघांमधील जुगलबंदी लोकायुक्तांसमोरच दिसून आली. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, पोलिस खात्याचे जिल्हा अधिकारी उपस्थित होते.

संपादक : विलास गोविंद कवठणकर





