उद्योगसामाजिक

देवाचीहट्टी बांधणाऱ्याला कोणी आधार देता का? आधार! ? ; वरून पाणी येते, तसेच खाली जाते!


दरवाजे बसवण्याचे रडगाणे कायमचेच; स्थानिक पुढारी बघ्याच्या भूमिकेत तर शेतकऱ्यांची नुसतीच पोकळ चर्चा, पुढे जाणार कोण?

 

देवाचीहट्टी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

उन्हाळ्यात दोन्हीं बाजूच्या हजारो हेक्टर्स शेतीचा आधार आणि तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री मारुती (हब्बनहट्टी) देवस्थानवर भाविकांना उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करणाऱ्या देवाचीहट्टी बंधाऱ्याला अलिकडच्या काळात कोणीच ‘आधार’ उरलेला नाही, त्यामुळे दरवर्षी या बंधाऱ्याचे दरवाजे बसवणे म्हणजे कायमचेच रडगाणे! स्थानिक ‘पुढारी’ उघड्या डोळ्यांनी बघून ‘पसार’ होतात तर शेतकरी आपापसात चर्चा करतात आणि तोंडावर बोट ठेवून ‘मुक्याचा’ गिळतात ! पुढे कोण?  सर्वच दरवाजांचे बांधकाम खालून तुटले असून, त्यातील लोखंडी बार बाहेर पडले आहेत, त्यामुळे हा बंधारा आणखी किती दिवस टिकणार ‘हाही’ भविष्यातील धोका ठरू शकतो! त्यामुळे आता नाही तर कधीच नाही, अर्थात काय तर सर्वच गमावून बसण्याची वेळ येऊ शकते, शेतकरी आणि स्थानिक पुढाऱ्यांनी जागृतीची ‘छाती’ पुढे करण्याची गरज आहे.!

 

जांबोटी आणि बैलुर भाग जोडणारा ‘दुवा ‘ ! 

साधारण वीस वर्षांपूर्वी  बैलुर, देवाचीहट्टी, तोराळी, गोल्ल्याळी परिसरातील नागरिकांना जांबोटीला जायचे असल्यास एक नदीचे पाणी कमी होईपर्यंत वाट पाहावी लागे, नाही तर कुसमळी पुलाचा दिवसाचा वेडा मारून ये – जा करावे लागत होते. त्यानंतर तात्कालीन सरकार आणि काहीं तालुकास्तरीय पुढाऱ्यांच्या जागृतीमुळे देवाचीहट्टी बंधाऱ्याची निर्मिती झाली अन् तो फेराही चुकला आणि नदीचे पाणी कमी होण्याचे दिवसही गेले. असा हा बंधारा म्हणजे महत्वाचा बैलुर – जांबोटी भाग जोडणारा महत्वाचा दुवा बनला आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता, या बंधाऱ्याबद्दल कोणाला काहीच पडलेले दिसत नाही अर्थात या बांधणाऱ्याची सुधारणा करणे आणि समस्या सोडवण्यासाठी कोणीच पुढे येतांना दिसत नाही . त्यामुळे  या बंधाऱ्याचे मोजकेच आयुष्य उरले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. स्थानिक नागरिक आणि पुढाऱ्यांनी आता आवाज उठवला नाही तर पुन्हा मागचे दिवस यायला वेळ लागणार नाही!

 

बंधाऱ्याची उंची वाढवण्याची गरज! 

हब्बनहट्टी, देवाचीहट्टी आणि बैलुर गावच्या हजारो हेक्टर्स शेतीसाठी हा बंधारा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे याच्या देखबालीसाठी सर्वांनी पुढे येणे काळाची गरज आहे. प्रथमतः या बंधाऱ्याची उंची वाढवून, पाण्याचे द्वार मोठे ठेवणे गरजेचे बनले आहे, अशाप्रकारे काम झाले तर नक्कीच हा भाग सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही. मात्र, यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत.

 

प्रतिक्रिया – 

दरवर्षी दरवाजे बसवण्याचे काम व्यवस्थित केले जात नाही, बळकटीचा रामराम केला जातो! असे असताना तालुक्यातील पाटबंधारे विभागाने अधिकारी करतात तरी काय? मामाजीका ‘घंटा ‘ ! याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज आहे.

– सखाराम धुरी, शेतकरी, देवाचीहट्टी!

 

बंधाऱ्यातील पाणी उत्तमरित्या आडवल्यास बऱ्यापैकी उन्हाळ्यातील पाणी समस्येवर तोडगा निघू शकतो, मात्र, दरवर्षी दरवाजे बसवण्याचे काम त्याप्रमाणे होत नाही, त्यामुळे फेब्रुवारीमध्येच याचे परिणाम भोगावे लागतात! यावर्षी तर पावसानेही हात दिल्याने असलेले पाणी आतापासूनच साठवून ठेवण्याची अत्यावश्यकता आहे.

– प्रभाकर हळदणकर, स्थानिक शेतकरी.

 

  

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *