बॉक्साइट वाहतूक म्हणजे चोरीच!
हब्बनहट्टी! बॉक्साइट वाहतूक म्हणजे चोरीच: आमदार विठ्ठल हलगेकर!
जांबोटी प्रजा सेवा आंदोलन कार्यक्रमात अधिकाऱ्यांना खडे बोल; कोणी परवानगी दिली? याची चौकशी करण्याची सूचना!
जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
बॉक्साइट वाहतूक म्हणजे चोरीच असल्याचे सांगत, संबंधित अधिकाऱ्यांना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी चांगलेच धारेवर धरले. जांबोटीत शनिवारी पार पडलेल्या प्रजासेवा आंदोलन कार्यक्रमात या समस्येबद्दल ते बोलत होते. कमी दर्जाच्या रस्त्यावरून मोठी अवजड वाहतूक होतेच कशी? याला कोणी परवानगी दिली, असा संतप्त सवाल आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना करतानाच, तात्काळ या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी सूचनाही यावेळी केली.
कमी वजनाच्या रस्त्यावरून अधिक वाहतूक कशी?
आधीच लहान आणि कमी वजनाचा रस्ता असताना त्यावरून 40 ते 50 टनाची वाहतूक होतेच कशी? भविष्यात रस्ता पूर्णच खराब झाला तर याला जबाबदार कोण? अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या वाहतुकीची चौकशी केली पाहिजे, अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही.
मला याची कल्पनाच नाही; कुठे काय घडते हे कळतच नाही!
तालुक्यात काही ठिकाणी बेकायदेशीर कामे सुरू आहेत, याची मला कोणतीही कल्पना नाही . तालुक्यातील अधिकारी कुठे काय करतात हे कळतच नाही, असे मत आमदारांनी यावेळी व्यक्त केले.

संपादक : विलास गोविंद कवठणकर




