मुलांना त्रास झाल्यास कोणाचीही गय नाही : गर्लगुंजी रूट’वरील बससेवा रविवारपासून पूर्ववत!
गर्लगुंजी पंचायतीचे माजी पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनाची केसआरटीकडून दखल…
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
खानापूर ते गर्लगुंजी रूटवरील सकाळी 9 वाजता धावणारी बस खानापूरला वेळेत न पोचल्यामुळे गेल्या 15 दिवसापासून गर्लगुंजी, निडगल, भांडरगाळी, बरगावच्या शाळेच्या मुलांना सुरुवातीचा एक क्लास चुकत आहे, अटेंडेस ऑनलाइन केलेली असल्यामुळे मुलावर अन्याय होत आहे.त्यामुळे सकाळ पासूनच्या सर्व बसेस वेळेत सोडाव्यात त्याचबरोबर रविवारी बेळगाव गर्लगुंजी बस प्रवासी कमी असल्यामुळे बंद करण्यात आली होती ती बस पूर्वरत चालू करावी..खानापूर बेळगाव डेपोच्या सर्व बसेस वेळेत सोडाव्यात असे निवेदन बस डेपो मॅनेजर संतोष याना देण्यात आले,यावेळी गर्लगुंजी माजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील, परशराम कोलकार,सदानंद कुंभार,अजय कोलकार,रोहित नावलगी, परशराम बेळगावकर,संतोष नाईक उपस्थित होते.
डीटीओशी चर्चा केल्यानंतर समस्या सुटली…
यावेळी डेपो मॅनेजर यांनी बेळगाव डेपो तसेच DTO यांच्याशी संपर्क साधला आणि रविवारी बस सुरळीत करून देण्याचे आश्वासन दिले,त्याचबरोबर खानापूर च्या बसेस वेळेत पाठविण्याचे आश्वासन दिले.
यापुढे मुलांना, नागरिकांना त्रास झाल्यास गय केली जाणार नाही असे प्रसाद पाटील यांनी डेपो मॅनेजर यांना सांगितले.

संपादक : विलास गोविंद कवठणकर





