हेमंत निंबाळकर यांनी बंगळूर शहर वाहतूक पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला!
यशस्वी आयपीएस अधिकारी निंबाळकर यांच्या अनुभवाचा शहरवासीयांना फायदा होणार…
बंगळूर: लोकहित न्यूज नेटवर्क
वरिष्ठ आयपीएस पोलिस अधिकारी हेमंत निंबाळकर यांची बंगळूर शहर वाहतूक पोलिस आयुक्त, तसेच राऊडी स्कॉड आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नवीन संकल्पनांची तसेच अनुभवाची बंगळूर शहरवासीयांना फायदा होणार असून, शहर वाहतुकीला शिस्त लागणार आहे, दिवसेंदिवस या शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांचीही संख्या झपाट्याने वाढत चालली आहे, त्यामुळे ट्रॅफिक जामची समस्या देशातील मोठ मोठ्या शहरांमध्ये सतावत आहे, त्यावर उपाय म्हणून ओव्हेब्रिझ सारख्या पर्याय व्यवस्था शासनाकडून करण्यात येत असल्या तरीही ही समस्या कमी होण्याचे नाव घेईना, बंगळूर शहराचीही हीच गत आहे, त्यामुळे यावर नवीन उपाय शोधण्यासाठी नूतन वाहतूक पोलिस आयुक्त हेमंत निंबाळकर यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होऊ शकतो, अशीच धारणा बंगळूर शहरवासीयांची आहे..

संपादक : विलास गोविंद कवठणकर





