उद्योगराजकीय

आमटे कृषी पत्तीन! कसर्लेकर मैदाना’त पण..?


निवडणुक लागणार की, बिन कर्जदारमुळे सोयीस्कर अदलाबदल होण्याची दाट शक्यता! तसा फॉर्म्युला सुरू असल्याची जोरदार चर्चा, तरीही लक्ष्मण कसर्लेकर म्हणतात,  मी निवडणुकीला आहे तयार…

 

जांबोटी:: लोकहित न्यूज वृत्त विश्लेषण (राजकारण)

आज देश राज्य, जिल्हा आणि स्थानिक लेवलचे राजकारण म्हणजे सोईस्कर सत्ता भोगण्याने क्षेत्र बनले. आपल्या आपणाला हवे ते पद पदरात पाडून घेण्यासाठी कोण कुठे आणि कसा कोणत्या थराला जाईल याचा नेम नसतो, अशीच परिस्थिती भारतीय राजकारणाची निर्माण झाली आहे. नुकतेच राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या कोल्हापूर गोकुळ दूध संघाच्या राजकारणाने एक वेगळाच पायंडा घालून दिला आहे, म्हणजे काय तर परीक्षेसाठी दिवसरात्र जिवाचं रान करून अभ्यास करणारा विद्यार्थी दोन नंबरला पास आणि श्रीमंत व्यक्तींचा मुलगा पैशांनी आगाऊ प्रश्नपत्रिका घेऊन, तेही घरात लिहून पहिला क्रमांकी! असे उदाहरण कोल्हापूरच्या राजकारणाचे देता येईल, कारण, महाआघाडीने 13 जागा जिंकल्या तर महायुतीला 12 जागा मिळाल्या, आपल्यातील लोक फुटून विरोधकांच्यात जातील अन् विरोधकांचा अध्यक्ष बसेल, या भीतीने सत्ताधाऱ्यांनी सहकार खात्यातील कायदाच बदलून, अधिक चार सरकार नियुक्त सदस्यांची निर्मिती करून आपले सहकारी मित्र अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी गटाचा अध्यक्ष करून टाकला. म्हणजे काय तर वर दिलेल्या कॉलेज विद्यार्थ्यांच्या परीक्षा उदाहरणाप्रमाणे झाले. अशाच स्थितीमध्ये खानापूर तालुक्यात चर्चेचा विषय बनलेल्या आमटे कृषी पत्तीन संघांचे ‘ राजकारण ‘ येऊन ठेपले आहे. विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर निवडणुकीच्या मैदानात पूर्ण तयारीनिशी उतरले आहेत खरे पण, तरीही  बिनकर्जदार’ साठी सत्तेचे घोडे आडल्याचे चित्र दिसू लागले आहे, तरीही मी निवडणुकीस तयार आहे, अशी डरकाळी मारणाऱ्या कसर्लेकर यांना पुढे जाऊन कुठे तरी बिनकर्जदार’ची कमी पडणार की काय? असा प्रश्न उपस्थित झाला असून, हीच कमजोरी पकडून विरोधकांच्या ‘ कोलांड’उड्या ‘ अर्थात विद्यमान सत्ताधारी आणि तब्बल दोन महिन्यांचे कोर्टातले विरोधक बिनकर्जदार’साठी सत्ता दोस्ती करण्याच्या मूड’मध्ये दिसत आहेत का? असाही प्रश्न दोन्हींकडील समर्थकांना पडू नव्हें म्हणजे झालं! पण, तरीही ‘मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली ‘ अशा स्थितीत येऊन ठेपले आमटे कृषी पत्तीन चे राजकारण!

 

सध्याचे बळाबळ काय?…

विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांच्याकडे कर्जदार बाजू फुल्ल आहे पण, बिनकर्जदारसाठी चाचपणी सुरू असून, त्यामध्येही मी यशस्वी असा राजकीय ‘स्टंट ‘ ते करत आहेत. पण, तरीही कुठे तरी बाजू कमकुवत वाटते की काय? असा ‘आतला’ संशय धूसर बनला आहे… त्यामुळे बिनकर्जदार’साठी विरोधकच ‘स्ट्राँग ‘ आहेत अशीच चर्चा रंगली असून, तसे झाले तर या पदासाठी ‘कसर्लेकर’ यांना एक पाऊल मागे घ्यावे लागणार की , ते आणखी कोणती राजकीय फटकेबाजी मारणार हे अलिकडच्या दोनच दिवसांत कळेल…. त्यामुळे राजकारणाची कोणती खरी दिशा नसते, त्यातील सत्ताधारी आणि विरोधी कधीही दाखविल्याप्रमाणे कट्टर नसतात, शिवाय आपल्या ‘पद ‘ स्वार्थासाठी कधी एकत्र येतील याची शाश्वती देता येत नाही, त्यामुळे समर्थकांनी राजकारणाची दोरी फार ताकदीने ओढणे म्हणजे ताकद वाया गेल्यासारखे आहे…

(सूचना:वरील विश्लेषण सध्याच्या चालू राजकारणाच्या चर्चेवरून मांडले आहे, याची नोंद घ्यावी!)


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *