तालुकावासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! जानेवारीनंतर पुन्हा तालुक्याच्या सेवेसाठी: माजी आमदार डॉ.अंजली निंबाळकर!
पक्षाची मोठी जबाबदारी असल्याने थोडा संपर्क कमी, पण तरीही तालुक्यातील समस्यांकडे लक्ष लागून, गोवा निवडणुकीनंतर पुन्हा सक्रिय होणार: डॉ. निंबाळकर!
खानापूर/ गोवा: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने AICC अर्थात अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याने माझ्या तालुक्याकडे थोडे लक्ष कमी झाले आहे, त्याबद्दल खानापूर तालुकवासियांचे क्षमस्व असावे! पहिल्यांदा सध्या सुरू असलेल्या दिवाळी सणाच्या तालुकावासियांना कोटी कोटी शुभेच्छा देते! दिवाळीच्या जागराने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ देत अशी देवाकडे प्रार्थना करते, अशा शुभेच्छा तालुक्याच्या माजी लोकप्रिय आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी लोकहित न्यूज च्या माध्यमातून दिल्या आहेत.
जानेवारीनंतर पुन्हा तालुक्याच्या सेवेशी: डॉ अंजली निंबाळकर!
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सचिवपदी माजी नेमणूक करण्यात आल्याने, मोठी जबाबदारी असल्याने माझ्या तालुक्याकडे थोडे लक्ष कमी झाले, तरीही अधूनमधून तालुक्यात फेऱ्या असतात, आमच्या कार्यकर्त्यांकडून लोकांनी कामे दूरध्वनीवरून कळविली जातात त्यांचा आम्हीं पाठपुरावा करत असतो. कोणीही काळजी करू नये, कोणत्याही समस्येसाठी थेट संपर्क साधावा असे आवाहन करत, जानेवारीनंतर पुन्हा तालुक्याच्या सेवेशी पूर्णपणे झोकून देऊ असा संदेश अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव तथा खानापूरच्या माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांनी लोकहित न्यूज च्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला दिला आहे. जानेवारीमध्ये गोव्याची निवडणूक असल्याने माझ्यावर मोठी जबाबदारी पक्षाने सोपवली आहे, त्यामध्ये माझा रोल महत्वाचा आहे. त्यामुळे आणखी दोनच महिने मी तालुक्याबाहेर असेन, त्यानंतर तालुक्यातील समस्या सोडविण्यावर माझा भर असेल ,असेही पुढे बोलतांना डॉ.निंबाळकर म्हणाल्या.
पुढील विधानसभा निवडणुकीसाठी मीच दावेदार…
राज्यात सध्या आमचे सरकार असून, सरकारने सामान्य जनतेसाठी उत्तम योजना आणल्या आहेत, त्याचा पुरेपूर फायदा गोरगरीब जनतेला झाला आहे, सरकारकडून तालुक्यात स्थापन स्थापन केलेल्या पंचहमी योजना कमिटीचे कार्यही उत्तम सुरू आहे, त्यामुळे तळागाळातील खऱ्या लाभार्थींना पाचही योजनांचा लाभ मिळत आहे. आमचेही यावर नियंत्रण असून, कोणाच्याही काहीं अडचणी असतील तर नक्कीच संपर्क साधावा असे आवाहन माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले आहे. आणखी दीड वर्षानंतर तालुक्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मीच दावेदार असून, माझ्या कामाची पोच पावती मागच्यावेळी तालुक्याने मला कौल दिला आहे. त्यानुसार माझ्या काळात बस स्थानक, दवाखान्यासह रस्ते, सामाजिक बाबतीत विकास साधला आहे, त्यामुळे यापुढेही तालुक्यातील जनता आणि आमचे नाते आजही तितकेच दृढ अर्थात घट्ट बनले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तालुक्याच्या प्रतिनिधित्वाची संधी मला आमची जनता देईल असा मला विश्वास आहे. तो सार्थकी ठरवण्यासाठी आणखी दीड वर्षानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मीच दावेदार असल्याचेही डॉ.अंजली निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकातून आमदारकीची तयारी…
आगामी जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्याचा आमचा प्रयत्न असेल, त्या अनुषंगाने पक्ष कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल, आमच्या सरकारच्या लोकप्रिय योजनांमुळे तालुक्यात काँग्रेसचे बळ वाढले आहे, त्यामुळे याही निवडणुकीत आमच्या पक्षाला चांगलेदिवस येणार आहेत, त्यानुसार आमची तयारी सुरू आहे, महिला, तरुणांसह योग्य उमेदवार देऊन त्यांना निवडूण आणण्याचे आमचे अथक प्रयत्न असतील. तरी कार्यकर्त्यांनी तालुक्यातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणतीच कसर ठेवू नये असेही त्या पुढे बोलतांना म्हणाल्या.
तालुकावासियांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा: डॉ अंजली निंबाळकर!
वर्षातील आनंदाचा सण आणि उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी सणाच्या शुभेच्छा 🎇 🪔! माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांनी पुन्हा एकदा तमाम तालुक्यातील जनतेला दिल्या आहेत. हा सण सर्वांच्या आनंदाचा जावो, ईश्वराने सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात अशी मी देवी देवतांकडे प्रार्थना करते असाही संदेश लोकहित न्यूज च्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना दिला आहे.

संपादक : विलास गोविंद कवठणकर





