उद्योगक्राईम

दुर्दैवी: हेल्मेट घातले तर ‘तो’ वाचला असता! ढोकेगाळीच्या युवकाचा कालमनीजवळ अपघातात मृत्यू!


महेश परशराम मादार मृत युवकाचे नाव; तो गोव्याहून गावाकडे निघाला होता, काँग्रेस कार्यकर्ते दीपक कवठणकर यांची धावाधाव!

 

कालमणी: लोकहित न्यूज (क्राईम)

अलिकडच्या काळात प्रत्येक वर्षाच्या एका महिन्यात तरी पोलिस, वाहतूक संस्था तसेच शासन आणि विविध माध्यमातून हेल्मेटची जागृती केली जाते, पण तरीही याकडे नागरिक वा वाहतूकदारकडून  म्हणावे तसे लक्ष दिले जात. त्याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे आताच काहीं क्षणात कालमनी (ता. खानापूर) जवळ अपघातात मृत्यू झालेल्या युवकाच्या घटनेवरून दिसून आले आहे, डोक्यावर हेल्मेट असते तर तो नक्कीच वाचला असता, अश्याच प्रतिक्रिया ऐकू येऊ लागल्या आहेत. महेश पशराम मादार (वय – 27 ) राहणार ढोकेगाळी (ता खानापूर) असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. तो गोव्याहून गावाकडे चालला होता, अती वेगात असल्याने दुचाकीची व्होल्व्हो मिनी बसला झालेल्या जोरदार धडकेत महेशचा जागीच मृत्यू झाला. एन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर एका युवकाच्या अपघाती जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज सकाळच्या  सुमारास ही घटना घडली आहे.

काँग्रेस कार्यकर्ते दीपक कवठणकर यांची धावाधाव; पण….

अपघाती स्थळी उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्ते दीपक कवठणकर यांनी ॲम्ब्युलन्स बोलावून त्या युवकाला वाचण्याचा प्रयत्न केला पण, त्याचा आधीच मृत्यू झाल्याने त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे ॲम्ब्युलन्सला परत जावे लागले…


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *