राक्षसांचा संहार करण्यासाठी नवदुर्गांची विविध रूपे; प्रादेशिक आयुक्त के.एम.जानकी !
प्रादेशिक आयुक्त कार्यालयातील महिला अधिकाऱ्यांची विविध रूपे आजच्या तिसऱ्या दिवशी सादर!
बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
देवलोकांच्या काळात राक्षसांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला होता, त्यामुळे त्याकाळी काय करावे हे देवतांना कळेनासे झाले होते, यावेळी दृष्ट राक्षसांचा संहार करण्यासाठी नवदुर्गांची विविध रूपे प्रकट होऊन, त्यांनी राक्षसांचा नयनात केला. अशा या नवदुर्गा सर्वांच्याच उद्धारकर्त्या बनल्या म्हणूनच दरवर्षी दसरा सणाला नवदुर्गांची विविध रूपे पहायला मिळतात. आजच्या समाजातही महिलांच्या रूपात नवदुर्गा विशाल रूप घेत आहेत, त्यानुसार महिलांनी धैर्याने महिलांच्या समस्यांसाठी पुढे आले पाहिजे, असे मत 7 जिल्ह्याच्या प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांनी व्यक्त केले. आज प्रादेशिक आयुक्त कार्यालयात महिला अधिकाऱ्यांनी विविध रूपे सादर केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. दसरा सणाचा आजच्या तिसऱ्या दिवसानिमित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रादेशिक आयुक्तांनी महिलांना संबोधित केले.
7 जिल्ह्याच्या अधिकारी असतानाही साधे राहणीमान!
7 जिल्हाधिकाऱ्यांच्या (DC) च्या वरच्या अधिकारी असतानाही सामान्य नागरिकांशी संयमाने वागणे, योग्य सल्ला देणे, सामान्य राहणीमान वावर असणाऱ्या अधिकारी म्हणून प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी मॅडम यांना ओळखले जाते. नाही तर ग्रामीण भागात खालच्या पदावर अधिकारी राहणारे गेंड्यासारखे वागताना दिसतात. ग्रामीण भागातील जनतेला भीती दाखवून नोकरी करणारे अधिकारीही खानापूर – जांबोटी आहेत. त्यांनी प्रादेशिकआयुक्तांचा अनुभव घेण्यास काहीच हरकत नाही. नाही तर एक ना एक दिवस जनतेकडून मोठा धडा घेण्याची वेळ येईल, हे अशा अधिकाऱ्यांनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.

संपादक : विलास गोविंद कवठणकर





