मनोरंजन

तळावडेच्या मैदानावर देवाचीहट्टी ‘स्टार ‘ !


18 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत देवाचीहट्टी रायझिंग स्टार प्रथम, वैयक्तिकमध्येही प्राविण्य!

 

तळावडे: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

नुकत्याच तळावडे (ता. खानापूर) येथे पार पडलेल्या 18 वर्षाच्या खालील क्रिकेट स्पर्धेत देवाचीहट्टी रायझिंग स्टार संघाने प्रथम पारितोषिक जिंकले आहे. यामध्ये आदित्य रमेश कांबळे,आर्यन रमेश कांबळे, ओंकार कुंभार यांच्यासह सर्वच खेळाडूंनी चांगलीच सांघिक चमक दाखवली! सयंमी आणि शांततेत तसेच स्पर्धेच्या नियमानुसार या संघाने खेळ खेळला, त्याबद्दल त्यांचे देवाचीहट्टी गाव आणि भागातून कौतुक केले जात आहे. या खेळाडूंना जांबोटी भागातील आयकॉन प्लेअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमेश कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ‘लोकहित न्यूज ‘तर्फे सर्व खेळाडूंचे अभिनंदन!

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *