सामाजिक

महालक्ष्मी कारखान्याकडून तोडणीसाठी शेतकऱ्यांना ‘अँडव्हान्स’: अध्यक्ष हलगेकर


शेतकऱ्यांनो हिकडं तिकडं भरकटू नका; ऊसाचेही पैशे आगाऊ मिळतील!

अध्यक्षांच्यांच्याहस्ते महालक्ष्मी कारखान्याच्या बॉयलरचे पूजन; होमहवन , पूजेचे आयोजन, कारखाना एमडी, संचालक आणि शेतकऱ्यांची उपस्थिती!

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

    यंदा कमी पाऊस लागला असला तरी ऊसाचे पीक उत्तम दिसते आहे. मात्र, इतर पिके दुष्काळात भस्म झाली आहेत, अशाच कारखान्यांनी उसाची उचल करायची म्हटले तर  शेतकऱ्यांकडे ऊस तोडण्यासाठी पैसेच राहत नाही, परिणामी हिकडून – तिकडून कर्ज काढून जोडगेरी लावावी लागते, त्या त्रासाची आम्हीं दखल घेतली असून , यंदा ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्यांना ‘अँडव्हान्स’ तोडणी देण्याचा निर्णय आम्हीं घेतला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही , अशी म्हत्वाची माहिती महालक्ष्मी (लैला शुगर्स) कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले आहे.

दसऱ्याचा उत्तम मुहूर्त साधून कारखान्याच्या बॉयलरचे पूजन, होमहवन, पूजेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. एमडी सदानंद पाटील यांनी सर्वांचे स्वागत करत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी कारखान्याचे संचालक, हितचिंतक, कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

 

 

शेतकऱ्यांनो हिकडं – तिकडं भरकटू नका; ऊसाचेही बिल अँडव्हान्स मिळेल: आमदार विठ्ठल हलगेकर 

पुढे बोलतांना, कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शेतकऱ्यांनो हिकडं -तिकडं भरकटू नका, महालक्ष्मी कारखान्यालाच ऊस पाठवा आणि उसाचे बिलही आगाऊ घेऊन जा, असेही आवाहन कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार विठ्ठल हलगेकर यांनी यावेळी शेतकऱ्यांना उद्देशून केले. त्यावर उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांनी सदर घोषणेचे स्वागत केले.

 

यंदा 5 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट: एमडी सदानंद पाटील!

गेल्यावर्षी आपल्या कारखान्याने 3 लाख टन उसाचे विक्रमी गाळप केले होते, शेतकऱ्यांचा प्प्रतिसाद पाहता, यंदा 5 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आम्हीं ठेवले असून, ते पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांचे मोठे सहकार्य हवे आहे, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास आम्हीं कटिबद्ध आहोत, सध्या दिल्लीत शेतकरी संघटनेच्या बैठकी सुरू असून, त्यामध्ये ठरलेला दर आम्हीं देऊ असेही, श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *