देवाचीहट्टीत ओगलेंच्या ‘पंडित वाणी’ने सर्वच विचारात!
गावच्या देवस्कीच्या जोरावर कोणावर अन्याय करू नका, पंचायत राजकारणात फार दिवस दुश्मनी ठेवू नका’चा सल्ला!
देवाचीहट्टी: लोकहित न्यूज (भाषणवाणी)
आम्हीं राजकारणी खरे नव्हे, आमच्या नादी लागून तुम्हीं बाद होऊ नका, गावच्या देवस्कीच्या तुम्ही कोणावर अन्याय करू नका, स्थानिक ग्राम पंचायत इलेक्शनचा ‘राग ‘ फार दिवस ठेवू नका अर्थात काय तर विसरून जा! शेवटी आपलेच गावं आहे, तिथे एकमेकाच्या सुखदुःखासाठी धावून जावे लागते, त्यामुळे या दोन्हीं गोष्टी अजिबात करू नका असा सल्ला खानापूरची युवकांची धडधडती तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम सेनेचे तालुका अध्यक्ष तथा भाजपा युवा नेते पंडित ओगले यांनी दिला. सोमवारी ( दि .9) दिमाखात पार पडलेल्या देवाचीहट्टी (ता. खानापूर) हेळेदेव ग्राउंड उद्घाघाटन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक मोतीराम रामा गावडे होते. बाजूला जिल्हा रयत मोर्चाचे उपाध्यक्ष तथा लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, तालुका काँग्रेस नेते दीपक कवठणकर, तालुका भाजपचे माजी प्रधान सचिव मारुती पाटील, बैलुर कृषीपत्तीन संघाचे अध्यक्ष दामोदर नाकाडी, जांबोटी भाजप युवा नेते दौलत कोलीकर, पवन गायकवाड, सचिन साबळे, शंकर गावडे, प्रभाकर शेंगाळे, भाजप नेते निंगाप्पा पाटील, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, गावचे ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण कुंभार, महादेव केरीकर, तुकाराम कवठणकर, मारुती लक्ष्मण कुंभार, माजी आमटे ग्राम पंचायत अध्यक्षा निकिता गोंडे, श्रीपाद उशीनकर आदी मान्यवर उपस्थित होते. सागर कांबळे यांनी स्वागत केले.
पुढे, बोलतांना श्री. ओगले म्हणाले की, राजकारण तेवढ्यापुरतीच असावे, त्यामध्ये ईळ्या – भोपळ्याची दुश्मनी असू नये, निवडणूक एकदा पार पडली की, घडलेलं सगळं विसरून जावे अन् पुन्हा गावात एकोपा ठेवावा, तालुक्यातील अनेक गावात देव-देवस्कीच्या जोरावर वैयक्तिक राग व्यक्त करत दादागिरीचे प्रकार वाढले आहेत, शिवाय देवाचीहट्टीतही घडलेल्या प्रकाराचीही चांगलीच जाणीव असल्याने पंडित ओगले यांनी अशा घटनांवर मुद्दामहून बोट ठेवत, असे प्रकार करणाऱ्यांना कुठे ना? कुठे तरी दणका बसतोच असेच त्यांना पुढे सुचवायचे होते. एकंदरीत काय तर राजकारणाचा राग आणि देव -देवस्कीच्या जोरावर कोणावर इतरांवर अन्याय करून अंगावर घेऊ नका असेच ओगले यांना सूचित करायचे होते. जांबोटी पश्चिम भागात खेळाडू तयार होण्याची जुनी परंपरा असून, हिंदू संस्कृती काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव याठिकाणी घ्यावा असेही ते पुढे बोलतांना म्हणाले.
आमदार विठ्ठल हलगेकर यांचे विशेष सहकार्य….
नेहमीच शिक्षण आणि खेळ अग्रस्थानी मनात या दोन्हीं क्षेत्रांना भरभरून मदतकार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणून तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे पाहिले जाते, तालुका असो वा कुठूनही या दोन्हीं क्षेत्रांसाठी मदतीची मागणी करणाऱ्यांना ते कधीच खाली पाठवत नाहीत, असा त्यांचा इतिहास आहे, त्यामुळे देवाचीहट्टी मैदानाला आमदारांचे सहकार्य नाही असे होवूच शकत नाही. त्याच्याकडून या मैदानासाठी मोठे आर्थिक सहकार्य लाभलेले असून, यापुढेही त्यांनी मदत करण्याची हमी दिली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे देवाचीहट्टी येथील सोमवारच्या मैदान उद्धघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील यांच्याकडून आयोजकांची दिलगिरी व्यक्त केली, शिवाय यापुढे कोणतीही मदत लागल्यास नक्कीच हाक मारावी असाही संदेश आमदार हलगेकर यांनी धाडला, त्यामुळे यावेळी आयोजकांतर्फे आमदार विठ्ठल हलगेकर यांचे जाहीरपणे विशेष आभार व्यक्त करण्यात आले..
कोण कोण काय म्हणाले….
लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील यांनी, गावचा एकोपा कायम ठेवत अशा सुंदर मैदानातून अनेक राष्ट्रीयParagraph खेळाडू घडावेत, जेणेकरून भागाचे आणि गावचे नाव अग्रस्थानी राहिले पाहिजेत, सर्वांच्या सहकार्याने सुंदर असं मैदान साकारल्याचेही त्यांनी सांगितले.
जांबोटी भागाचे सामाजिक कार्यकर्ते तथा धगधगती हिंदुत्ववादी तोफ म्हणुन ओळखले जाणारे अनंत सावंत याचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले, ते म्हणाले की, माझ्या पत्नी आरोही सावंत यांच्या काळात या मैदानासाठी विशेष प्रयत्न लाभले असून, त्यासाठी तत्कालीन ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर व पत्रकार विलास कवठणकर यांचे विशेष प्रयत्न फलदायी ठरले आहेत, असेही ते म्हणाले.
माजी तालुका भाजप प्रधान सचिव मारूती पाटील यांनी, उत्तम मैदान साकारले असून, त्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व युवकांचे कौतुक केले. असाच एकोपा कायम ठेवत, मोठमोठे खेळाडू या मैदानातून घडवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी माजी सैनिक रमेश कांबळे, तुकाराम कुंभार, सुनील केरीकर, महादेव कवठणकर, चंद्रकांत कुंभार, विक्रम धुरी, विष्णू कुंभार, अजय कवठणकर, लक्ष्मण कालमनकर, शंकर बामणे, नामदेव कवठणकर, प्रतिक हळदणकर, सतीश धुरी, राकेश कांबळे, दुलाजी कुंभार, सचिन गावडे, संतोष कुंभार, अशोक बामणे, ज्ञानेश्वर धुरी आदी उपस्थित होते.

संपादक : विलास गोविंद कवठणकर





