सामाजिक

चार दिवसात खानापूरचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा


चार दिवसात दुष्काळग्रस्त यादीत खानापूरचा समावेश करा: माजी ग्रा. पं. सदस्य पाटील…

 

विधवा, वृद्ध आणि अपंगांच्या पेन्शन लवकरात लवकर सुरू करा, गर्लगुंजीसह 22 ठिकाणी उप तहसीलदार कार्यालये सुरू करा!

 

बेळगाव जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर मध्ये प्रजासेवा आंदोलनासाठी पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी तसेच जिल्हाधिकारी,Mlc आणि खानापूर तालुक्याचे आमदार उपस्थित होते

यावेळी

1)खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि कर्जमाफी साठी प्रयत्न करावे

२) विधवा अपंग आणि वृद्ध यांच्या बंध असलेल्या पेन्शन त्वरित सर्वे करून परत चालू कराव्या

३) गर्लगुंजी आणि अजू बाजूच्या 22 गावासाठी नेमदि केंद्र,सर्कल, डेप्युटी तहसीलदार ऑफिस गर्लगुंजी येते करावे म्हणजे सर्व 25 किमी अंतर कापून बारीक सारीक कामांना जांबोटीला जावे लागणार नाही..किंव्हा सध्या खानापूर मध्ये नेमदी केंद्र करून द्यावे यासाठी सतीश Jarkiholi ,आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली

सतीश Jarkiholi यांनी जिल्हाधिऱ्याना या विषयी सांगितले आणि त्वरित सर्वे करून नेमदि केंद्र करून द्यावे असे आदेश दिले.जिल्हाधिकारी यांनी पूर्ण माहिती घेऊन करुन देण्याचे आश्वासन दिले.त्याचबरोबर येत्या 4 दिवसात खानापूर दुष्काळ ग्रस्त यादीत समावेश होईल आणि नुकसान भरपाई दिली जाईल,असे सांगितले


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *