तालुका काँग्रेसला लवकरच ‘अध्यक्ष’ मिळणार!
कॉंग्रेस चे संघटन सृजन अभियान भाग २ आज खानापूर येथे शिवस्मारकमध्ये पार पडले…
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
जिल्हा ब्लॉक काँग्रेसच्या आदेशानुसार गुरुवारी (दि. 12) खानापूर काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत खानापूर शिवस्मारकमध्ये तालुका काँग्रेसची सृजन अभियानांतर्गत सभा पार पडली. यामध्ये लवकरच एआयसीसी सचिव तथा माजी डॉ .अंजली निंबाळकर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन तालुका अध्यक्षपदाची प्रक्रिया पार पडणार आहे. असा महत्वाचा निर्णय या बैठकीत झाला असून, त्या व्यतिरिक्त इतरही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हास्तरीय पक्षाचे निरीक्षक म्हणून शाकीर सनदी, बडीगर, रशीद चिकोडी आणि जिल्हाध्यक्ष बसवराज शेगावी यांनी उपस्थित होते. यावेळी खानापूर तालुका ब्लॉक अध्यक्ष व पदाधिकारी तसेच पक्षाचे सिनियर मंडळी रियाझ पटेल, बसाप्पा बसेटी, गौसलाल पटेल, रमेश गौडा पाटील, संगाप्पा वाली आर डी हांजी संतोष हाजी काशिम हट्टीहोळी, दशरथ बनोशी बेनी पिंटो महिला अध्यक्ष सावित्री मादार, दिपा पाटील, वैष्णवी पाटील, अनिता दडंगल, सखुबाई पाटील भारती पाटील वगैरे वगैरे युथ अध्यक्ष व सर्वजण उपस्थित होते. यावेळी अनेकांनी तालुका अध्यक्षपदासाठी जिल्हा नेतृत्वाकडे सादर केले, त्याचा माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांच्यासह जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विचार केला जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
महादेव कोळी यांचा विशेष सत्कार…
महादेव कोळी यांची राज्य सरकारने यलाम्मा देवी विकास प्राधिकरण वर नियुक्ती केल्याबद्दल जिल्हा आणि तालुका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला.

संपादक : विलास गोविंद कवठणकर





