लोंढा सर्वसाधारण’वर तर पारीश्वाड कक्केरी एसी,एसटीवर अक्षेप!
प्रसंगी कोर्टात जाण्याचा तयारी; सरकारची अर्थिक अडचण आहे?
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
लोंढा आणि पारीश्वाड zp आरक्षणावर आक्षेप घेण्यात आले असून, सरकारने वेळीच दखल न घेतल्यास कोर्टात जाण्याची तयारी तक्रारदाराने घेतली आहे. लोंढा संघात गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसाधारण सीट’च अर्थात आरक्षण जागा येत असून, पारीश्वाड संघात एसी -एसटी सीट (आरक्षण)वारंवार येत आहे, त्यामुळे इतर समाजातील नागरिकांनी काय करावे? असा प्रश्न विचारत रामचंद्र मादार यांनी लोंढा zp आरक्षणावर आक्षेप घेतला आहे तर पारीश्वाड zp आरक्षणावर यशवंत कोडीळी यांनी तक्रार केली आहे.
लोंढा जि पं. संघाचा इतिहास काय? तक्रारदाराचे म्हणणे काय?
लोंढा जिल्हा पंचायत विभागात 2012, 2016 ला सर्वसाधारण महिला आरक्षण आले असून, यंदाही तेच (2026 ) आरक्षण आल्याने इतर समाजाने कुठे? जावे! असा सवाल रामचंद्र मादार (रा. गुंजी) यांनी केला आहे. मादार यांनी जिल्हाधिकारी, निवडणूक आयोग आणि राज्य सचिवांना पत्र पाठवून सदर आरक्षणावर आक्षेप नोंदविला आहे. पारीश्वाड आणि कक्केरी zp आरक्षणावर यशवंत कोडीळी यांनी तक्रार केली आहे. या दोन्हीं मतदार संघात एसी, एसटी आरक्षण वारंवार आले असून, इतर समाजाला अलीकडच्या काळात संधीच मिळाली नाही, यावेळी तरी सरकारने आरक्षणात बदल करून इतर समाजासाठी आरक्षण द्यावे अशी मागणी यशवंत कोडीळी यांनी केली आहे.

संपादक : विलास गोविंद कवठणकर





