समीक्षा पैलवानाचा आमटेत गौरव!
इतरांनीही आदर्श घेण्याचे आवाहन; आमटे ग्रामस्थांकडून समीक्षा उशिनकर हिचा सत्कार..
आमटे: लोकहित न्यूज (क्रीडा) कृष्णा भरणकर
जिजामाता मराठा मंडळ हायस्कूल, बेळगांव आठवीची विद्यार्थिनी समीक्षा श्रीपाद ओशिणकर, मुळता तळावडे (सध्या रा. खानापूर) हिने राज्य लेवल 50 किलो वजन गटाखालील कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत, गोल्ड मेडलवर आपली मोहोर उमटवली. त्या तिच्या उत्तम यशाबद्दल आमटे येथील शिवशक्ती युवक संघ तसेच पंचमडळी व ग्रामस्थांच्या वतीने आज सत्कार करण्यात आला. यावेळी आमटे ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण गुरव म्हणाले की, तळावडेसारख्या दुर्गम खेड्यामध्ये जन्म घेऊन आपल्या चिकाटीने व जिद्दीने शिक्षणाबरोबरच खेळामध्येही प्राविण्य मिळविले . त्यामुळे आपल्या भागाबरोबरच जिल्ह्याचेही नाव लौकिक केले आहे. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी समीक्षाचा आदर घेऊन शिक्षणाबरोबरच खेळामध्येही भाग घेतला पाहिजे. असे उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच गट नेते प्रकाश गुरव यांनीही समीक्षाचे कौतुक करत आपण सर्व ग्रामस्थ व शिवशक्ती संघ समीक्षाच्या पाठीशी आहोत,असे बोलत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील युवक तसेच ग्रामस्थ, पंच मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक : विलास गोविंद कवठणकर





