राजकीय

उत्सुकता! तालुका काँग्रेस अध्यक्ष उद्या निवड; नव्यांची वर्णी लागणार की? जुनेच कायम राहणार!


तालुका ब्लॉक काँग्रेसचे उद्या( दि.12) संघटन सृजन अभियान; खानापूर शिवस्मारकात 10.30 वा. या कार्यकमाचे आयोजन, तालुका अध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी अर्ज भरावे लागणार!

 

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

जिल्हा ब्लॉक काँग्रेसच्या आदेशानुसार तालुका अध्यक्षपदाची निवड आणि तालुक्यात काँग्रेसचे संघटन अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने (उद्या गुरुवारी. 12) खानापूर शिवस्मारकमध्ये काँग्रेस सृजन अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे, यावेळी पक्ष बळकटीवर चर्चा करण्यात येणार असून, यावेळी तालुका अध्यक्षपदाची निवड करण्यात येईल, आगामी जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड आणि हे अभियानही महत्वाचे ठरणार आहे. तरी या पदासाठी इच्छुकांनी यावेळी उपस्थित राहून अर्ज करायचे आहेत. तरी तालुक्यातील पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते आणि काँग्रेस समर्थकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन तालुका ब्लॉक काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे.

 

जुनेच राहणार की, नव्यांना संधी मिळणार? 

कोणत्याही पक्षाच्या दृष्टीने तालुका अथवा जिल्हा अध्यक्ष पद महत्वाचे असते. राज्य पक्षीय निर्णय आणि महत्वाच्या सूचना त्यांच्यामार्फतच तालुका काँग्रेसजणांना पोहचत असतात, आगामी जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणूकीत कोणाला तिकीट अर्थात उमेदवारी द्यायची हाही निर्णय त्यांच्यामार्फतच घेतला जातो, त्यामुळे हे पद फार महत्त्वाचे मानले जाते. खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष पद रिक्त असून, उद्याच्या सृजन अभियानामध्ये त्या पदाची सर्वानुमते निवड करण्यात येणार आहे, निवड प्रक्रिया पार पडण्यासाठी जिल्हा निरीक्षक उपस्थितीत राहणार आहेत. त्यामुळे पक्षीय नियम आणि परंपरेनुसार ही निवड केली जाईल. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता, नव्यांना संधी मिळण्याची शक्यता फार कमीच दिसत असून, जुन्यांचीच बाजू वरचढ दिसत आहे. त्यामुळे जुनेच राहणार की, नव्यांना संधी मिळणार हे पाहणे औत्स्क्याचे बनले असून, उद्याच्या सृजन अभियानानंतर स्पष्ट होईल, तरी अधिक माहितीसाठी केपीसीसी सदस्य महादेव कोळी आणि ब्लॉक अध्यक्षांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे…

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *