उद्योगसामाजिक

बेळगांव महानगरपालिका; हजेरी बुकावर राज्य उपलोकाक्तांचे प्रश्नचिन्ह,आयुक्तांसह अधिकाऱ्यांना फुटला घाम! !


महापालिकेच्या हजेरी बुकावर प्रश्नचिन्ह, कोऱ्या रेष्यांसह गोंधळ; राज्य उपलोकायुक्तांकडून अधिकारी धारेवर; दोन महिला अधिकाऱ्यांचे फोन – पेवर सापडले लाखोंचे ट्रांझेक्शन !

 

बेळगांव:  लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

बेळगांव शहराच्या दृष्टिकोनातून म्हत्वाची यंत्रणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महानगर पालिकेच्या कर्मचारी हजेरी बुकमध्ये गोंधळ सापडल्याने राज्य उपलोकायुक्त बी. वीरप्पा यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करताच, महापालिका आयुक्त कार्तिक आणि त्यांच्या सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. आजपासून तीन दिवस बेळगांव दौऱ्यावर असलेले राज्य उपलोकायुक्तांनी (पोलिस) अचानक महापालिकेत धडक मारून कागदपत्रांची झाडाझडती घेतली. त्यामध्ये सर्वच विभागातील हजेरी रजिस्टर आणि विकास कामगिरी बुकात ताळमेळ नसल्याचे तपासणीदरम्यान दिसून आले. यावरून राज्य पोलिस उपायुक्तांनी क्रमवार अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यावरून बराच काळ गोंधळ उडाला होता, शिवाय अधिकाऱ्यांची पळापळ झाल्याचे दिसून आले.

 

दोन महिला अधिकाऱ्यांच्या फोन – पेवरून लाखोंचा व्यवहार; स्टेटमेंट देण्याचा आदेश….

महापालिकेतील सर्व विभागांची झडती घेतानाच, दोन महिला अधिकाऱ्यांचे फोन – पे चेक केले असता, लाखोंचे ट्रांझेक्शन झाल्याचे दिसून आले. त्याबद्दल सदर महिला अधिकाऱ्यांना लोकायुक्तांनी उलट -सुलट प्रश्न विचारले असता, त्याचे ठोस उत्तर देता आले नाही. त्यामुळे उपलोकायुक्तानी त्या दोघींचेही बँक स्टेटमेंट देण्याची सूचना केली.

 

 

अधिकाऱ्यांचा अजब दावा; शहरात कुठेही पाणी समस्या, लाईटची समस्या नाही!

कार्यालयीन कागदपत्रे तपासल्यानंतर पाणी आणि फुटपातवरील लाईट ( सौरदिवे) आणि शहरातील पाणीपुरवठ्यावर प्रश्न केला असता, या दोन्हीं समस्या कोठेही नसल्याचा अजब दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी राज्य उपलोकायुक्तांसमोर केला. त्यामुळे संतापलेल्या उपलोकयुक्तांनी  विचार करा ही अशीच बातमी याठिकाणी उपस्थित असलेल्या वृत्त वाहिन्या आणि दैनिकांमध्ये उद्या छापून येणार आहे, त्याला तुम्हीच जबाबदार असाल असा इशारा दिला. वास्तविक पाहता, अधिकाऱ्यांचा हा दावा पूर्णपणे खोटा ठरला असून, मागच्याच आठवड्यात वीरभद्र नगरमधील नागरिकांना टँकरने विकत पाणी घेऊन सोस भागवावा लागला . तर शहरातील अनेक फुटपातवरील लाईट (पथदीप) बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांना झालेय तरी काय? असा प्रश्न सामान्यांतून विचारला जात आहे.

 

महापालिकेची अशी अवस्था असेल तर खात्यांची काय?

राज्यातील नगरविकास खाते शहरांच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाते. ग्रामीण भागापेक्षा या खात्यामध्ये दोन पट विकास निधी उपलब्ध असतो. याच खात्यांतर्गत महापालिका, नगरपंचायत, नगरपरिषद या यंत्रणा येतात. मात्र, याच यंत्रणांचा कागदोपत्री कारभार गोंधळाचा असेल तर? इतर ग्रामीण भागातील सरकारी यंत्रणांची काय परिस्थिती असेल, असा सवाल सामन्यातून उपस्थित केला जात आहे.

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *