उद्योग

माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करा; माझी वैयक्तिक बदनामी; एक कोटींचा दावा ठोकणार: संपादक,विलास कवठणकर


दैनिक तरुण भारत आणि काहीं वृत्त वाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीला प्रत्युत्तुर! तालुका सरकारी कर्मचारी संघटनेला कोर्टात खेचणारच, मी अपंग असल्याने मला त्रास देण्याचा प्रयत्न, पोलिसात जाणार…

 

लोकहित न्यूजचे संपादक विलास कवठणकर यांचा खुलासा!

 

खानापूर लोकहीत न्यूज-

शुक्रवारी खानापूर तालुका सरकार नोकर संघटनेचे पत्रकार परिषद घेऊन, माझ्यावर अडीच लाख रुपये मागितल्याचा आरोप केला आहे, तसे वृत्त आजच्या दैनिक तरुण भारतमध्ये छापून आले असून, काहीं वृत्त वाहिन्यांमध्येही प्रसिद्ध झाले आहे. ते सर्व आरोप खोटे असून, तहसीदार दुंडप्पा komar, जांबोटी उपराजसिलदार एस . के. तंगोळी, यांनी त्यांच्या सरकारी कामगार संघटनेच्या माध्यमातून केलेले आरोप आपली ‘दारुडी’ वृत्ती लपविण्यासाठी हलकट कृत्य केले आहे. त्याचा मी माझ्या लोकहित न्यूज पोर्टलच्या माध्यमातून खुलासा करत आहे, त्यांनी केलेले आरोप आपली करून दाखवावे, मी केलेली बातमी आणखी काहीं गोष्टींचा खुलासा पुराव्यानिशी सिद्ध करेन! तालुक्यातील जनतेला तहसीलदार कार्यालयातील कारभार माहितीच आहे, कशी लोकांची पैशासाठी पिळवणूक होते ती! खानापूर तहसीलदार कार्यालयात बोगस कामे चालतात, शिवाय पैशाशिवाय कोणतेच काम होत नाही हेही सर्वांना माहिती आहे. आता राहिला प्रश्न माझ्या तहसीलदार बातमीचा, तालुक्यातील जनता त्रासात असताना,तालुका दंडाधिकारी अर्थात तहसीलदार त्यांचे उपतहसीलदार, सर्कल दारू पार्टी करू शकतात का? माझ्या बातमीमध्ये तहसीदार यांचे सरकारी वाहन दिसते आहे, शिवाय माझ्याकडे तसे पुरावेही आहेत, ते मी सर्व माध्यमांसमोर प्रसिद्ध करेन.

 

माझी वैयक्तिक बदनामी, एक कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार! 

माझे मंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांच्यासह अनेकांशी घनिष्ठ संबंध आहेत, मी त्यांना वरच्या वर भेटत असतो, मी देवाचीहट्टी गावातील गावच्या गावठाणचा मुद्दा उपस्थित करत, भविष्यात सर्व गावासाठी त्याचा उपयोग व्हावा म्हणून माझ्या गावचे काही लोक आणि ग्राम पंचायत सदस्य यांच्या मदतीने वेळोवेळी आवाज उठवले आहे, ते प्रकरण शेवटच्या टप्प्यात आहे, त्यासाठी तसेच आणखी काही लोकांची कामे, माझी वैयक्तिक कामे यासाठी मी वरचेवर जिल्हाधिकारी,zp ऑफिसला भेटत असतो, तसेच आणखी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक असल्याने, त्यामुळे माझ्या आवडीसाठी मी माझ्या स्टेटवर ठेवलेल्या फोटोचे प्रिंट काढून कालच्या सरकारी कर्मचारी संघटनेच्या पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले आहे, माझा वैयक्तिक विषय इतरांसमोर प्रसिद्ध करणे, किंवा दाखवणे कायद्याने चुकीचे आहे, कोणीही स्वतःचा स्टेट्स स्वतःच्या समाधानासाठी ठेवू शकतो, त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात, त्याला कोणीही दुखावू शकत नाही, प्रत्येकाला कोणाचाही स्टेट्स फोटो, ठेवणे स्वतःचा स्टेट्स ठेवण्यास पूर्णपणे स्वातंत्र्य आहे, मी तहसीदार असे किंवा आणखी कोणी, असो त्यांच्या वयक्तिक बाबतीत कोणतीच प्रसिध्दी केली नाही, सार्वजनिक बाबतीत बातमी केली आहे. त्यांनी माझ्या वयक्तिक बाबतीत धक्का पोहचवला आहे, त्याची त्यांना किंमत मोजावी लागणारच! माझ्या वयक्तिक विषयाची प्रसिध्दी वा बदनामी केल्याच्या आरोपाखाली एक कोटींचा अब्रु नुकसानी दावा ठोकणार आहे,.

 

तालुकावासितांसाठी आवाहन…

माझ्या लोकहित न्यूज च्या माध्यमातून मी नेहमीच जांबोटी भाग आणि तालुक्यातील लोकांसाठी आवाज उठवला आहे, तालुक्यातील काहीं सोसायट्या बुडीत गेल्या असून, त्यामध्ये गोरगरीब जनतेच्या ठेवी अडकून पडल्या आहेत, त्याविषयी मी आवाज उठवल्याने जिल्ह्यातील 800 सोसायट्यांची चौकशी सूरू झाली, शिवाय काहीं लोकांच्या ठेवी परत मिळाल्या असून, विशेष म्हणजे माझ्या बातमीमुळे नागरिक जागृत झाले. अशा खूप बातम्या प्रसिद्ध केल्या असून, मी नेहमीच लोकांचे प्रश्न स्पष्टपणे मांडत असतो, तालुक्यातील अधिकारी किती धुतल्या तांदळासारखे आहेत, हे तालुक्यातील जनतेला माहितीच आहे,त्यांच्याविरोधात आम्हीं आवाज उठवणे म्हणजे लोकांची बाजू मांडणे आहे, तालुक्यातील जनतेला आवाहन करतो, की असे कोणतेही चुकीचे काम मी केलेले नाही आणि करणारही नाही, माझ्यावर झालेले आरोप स्वतःची चूक लपविण्यासाठी केलेले आहेत, ते मी तुमच्यासमोर सिद्ध करून दाखवेन, अशी आपल्याला खात्री देतो.

(वेब पोर्टल केंद्र सरकारच्या डिजिटल मिडिया अंतर्गत येते, त्याची गुगल नोंद असते, गुगलला सरकारी मान्यता आहे…)

कळावे आपला

विलास कवठणकर, संपादक लोकहित न्यूज..


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *