बाबुराव देसाई ‘साहेब ‘ जांबोटीकडे ‘परत’ या; कार्यकर्त्यांची हाक!

2005 साली जांबोटी म. ए. समितीच्या गडाला खिंडार पाडत देसाई यांनी विजय प्राप्त केला होता!
जांबोटी/ खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
खानापूर तालुक्यातच मोठा मतदार संघ म्हणून ओळख असलेल्या जांबोटी जिल्हा पंचायत मतदार संघाचा इतिहासही तितकाच रंजक आहे. 2005 पर्यंत म. ए . समितीचा गड म्हणून या संघाची ओळख होती पण, त्याच साली मूळचे वडगावचे (सध्या रा. लोंढा) सुपुत्र बाबुराव देसाई यांनी जि. पं. निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवत समितीच्या गडाला खिंडार पाडले होते, त्याकाळी बाबुराव देसाई यांची उत्तम उद्योगपती म्हणूनही ख्याती होती. त्याच जोरावर त्यांनी हा कारनामा करून दाखवला होता. सद्यस्थितीत जांबोटी भागात ढीगभर इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून रेसमध्ये असले तरी, बाबुराव देसाई यांच्या जांबोटी भागातील काहीं कार्यकर्त्यांनी बाबुराव देसाई तुम्हीं ‘जांबोटीकडे परत या’ अशी हाक मारली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कमालीची रंगत येणार असल्याचे चित्र दिसत आहे.
कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी इच्छुक: मा. जि. सदस्य बाबूराव देसाई !
गेल्या अनेक वर्षांपासून माझे कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत, त्यांच्यासाठी मी तर माझ्यासाठी ते धावून येतात, असे आमचे घट्ट नाते आहे. त्यामुळे त्यांचा आग्रह असेल तर जांबोटी जि. पं. रिंगणात यावेच लागेल असे स्पष्टीकरण देतानाच, मीही इच्छुक असल्याची तयारी माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना सांगितले.
संयमी आणि समाधान, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून बाबुराव देसाई यांची ओळख!
सध्या लोंढा या ठिकाणी वास्तव्यास असले तरी ते मूळचे वडगांव (जांबोटी) येथील सपुत्र म्हणून ओळखले जातात, व्यवसायासाठी त्यांनी गाव सोडले, नाव कमावले आणि पुन्हा 2005 साली आपल्या जांबोटी विभागात जिल्हा पंचायत सदस्य म्हणून आपली मोहोर उमटवली असा, कमालीचा इतिहास माजी जिल्हा पंचायत सदस्य तथा भाजपचे वरिष्ठ नेते बाबुराब देसाई यांची ओळख आहे. अती सयंमी, समाधान आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आजही तालुक्यात त्यांच्याकडे पाहिले जाते. नेहमी कार्यकर्त्यांशी संयमाने, प्रेमाने त्यांच्या अडचणींना धावून जाणारे नेते आहेत असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात.
प्रतिक्रिया –
जांबोटी जिल्हा पंचायत म. ए. समितीच्या गडाला सुरुंग लावत जांबोटी भागात भाजपचा झेंडा फडकवणारे नेते म्हणून बाबुराव देसाई यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी उत्तम संधान साधतांनाच, त्यांची विकास कामगिरीही चांगली आहे, त्यामुळे ते जांबोटी भागात आले तर ‘ऑलवेज वेल्कम ‘ !
– सुनील देसाई, माजी जांबोटी पंचायत उपाध्यक्ष, भाजप नेते, वडगांव!

संपादक : विलास गोविंद कवठणकर





