उद्योगक्राईम

विश्रांतवाडीत घरासमोर ठेवलेली दुचाकी कोणी पेटवली!


अजब प्रकार; पोलिसांकडून पाहणी, पण असा दहशतीचा प्रकार केला कोणी? 

विश्रांतवाडी: लोकहित न्यूज (क्राईम)

घरासमोर ठेवलेली दुचाकी (एफझेड) अज्ञातांनी मध्यरात्री पेटवून दिल्याची घटना विश्रांतवाडी (ता. खानापूर) येथे गुरुवारी ( 12) रोजी उघडकीस आली. असा हा निंदनीय प्रकार कोणी केला असावा? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांना आहे. या घटनेची माहिती मिळताच, खानापूर पोलिस उपनिरीक्षक निरंजन व त्यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली, राजू चव्हाण ( भैया) यांची ही दुचाकी असून, बाजूच्या गावच्याच एकावर दाट संशय असल्याची चर्चा आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे.

 

दुचाकी पेटवून, दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न…

पालट्यावर राहून मध्यरात्री दुचाकी पेटवून देण्यात आली, परिणामी आगीचा भडका इतका होता की, बाजूला असलेली लाकडेही जळून गेली आहेत, बाजूच्या नागरिकांच्या सावधगिरीने मोठा अनर्थ टळला. घटना घडलेले घर खानापूर – जांबोटी रस्त्यावर असल्याने नेहमीच वर्दळ असते, त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्यांनी आगीचा भडका पाहून राजू चव्हाण यांना जागे केले. शिवाय आगीच्या भडक्यावर पाणी टाकून आग विझवण्यास आली पण, तोपर्यंत दुचाकी पूर्ण जळून गेली होती. एकंदरीत काय तर दुचाकी पेटवून देऊन, दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

 

गावात पहिलाच प्रकार; गावकरी हादरून गेले…

दुचाकी पेटवण्यासारखा निंदनीय प्रकार पहिल्यांदाच घडल्याने गावकरी हादरून गेले आहेत, काय वेगळाच प्रकार घडल्याचे उपस्थित नागरिकांनी घटनास्थळी लोकहित न्यूज शी बोलतांना सांगितले. तात्काळ पोलिसांनी या घटनेचा तपास लावावा अशीच मागणी नागरिकांतून केली जात आहे.

 

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *