ZP म. ए. समिती! बेळगावकरांचे भाऊ ‘शिवाजी’ जांबोटीचा ‘गड ‘ लढवण्यास तयार!
कुसमळीचे सुपुत्र शिवाजी बेळगावकर, माजी बैलुर ग्रा. पं. सदस्य, धनलक्ष्मी सोसायटीच्या माध्यमातून जांबोटी भागात चांगलाच परिचय!
कारण राजकारण – ( म.ए. समिती)
जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
म. ए. समितीचे माजी तालुका अध्यक्ष, माजी जिल्हा पंचायत सदस्य तसेच समितीतील प्रभावी नेते विलास बेळगावकर यांचे बंधू शिवाजी बेळगावकर यांनी जांबोटी जिल्हा पंचायत विभागात म. ए. समितीतून लढण्यास तयार आहेत, ते कुसमळी गावचे सुपुत्र असून, बैलुर ग्राम पंचायत सदस्य राहिलेले आहेत, शिवाय त्यांनीही श्री धनलक्ष्मी सोसायटीची स्थापना करून आपल्या ओळखीचे जाळे जांबोटी भागात पसरले आहे. म. ए. समितीतूनच वीस वर्षांपूर्वी विलास बेळगावकर यांना समितीतून उमेदवारी मिळाली होती, त्यानंतर इतका काळ ते समिती लढ्याचे साक्षीदार बनून आहेत, त्यांच्याच प्रभावामुळे शिवाजी बेळगावकर यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
संयमी, हुशार आणि सामान्य व्यक्तिमत्व म्हणुन ओळख!
शिवाजी बेळगावकर हे विलास बेळगावकऱ्यांचे धाकटे बंधू असून, अतिशय संयमी, हुशार आणि सामान्य व्यक्तिमत्व म्हणून शिवाजी यांची ओळख आहे, कुसमळी गावचे प्रतिष्ठित पंच म्हणूनही ते परिचयाचे आहेत. शेती व्यवसायातही ते उत्तम असल्याने त्यांची सामान्य नागरिकांशी चांगले नाते आहे, त्यामुळे गाव आणि आजूबाजूच्या परिसरात एक सामान्य माणूस म्हणून त्यांची चर्चा होत असते, त्यामुळे एकवेळ आशा एका सामान्य माणसाला तिकीट मिळाले तर काय हरकत आहे, असाही मतप्रवाह मतदारातून व्यक्त होत आहे.
माजी ग्राम पंचायत सदस्य, धनलक्ष्मी सोसायटीचे संस्थापक!
शिवाजी बेळगावकर हे कुसमळी गावातून बैलुर ग्राम पंचायतीवर सदस्य राहिले आहेत, त्यामुळे गाव आणि बाजूच्या गवळीवाडा, देवाचीहट्टी, बैलुर, ओलमणी, जांबोटी, कणकुंबी परिसरातही चांगला परिचय आहे, त्यामुळे त्यांच्या ओळखीचा फायदा समितीला होऊ शकतो, विशेष म्हणजे शिवाजी यांच्यावर कोणताही राजकीय अथवा वैयक्तिक डाग नसून, फ्रेश सामान्य व्यक्ती म्हणून त्यांची भागात ओळख आहे.
बेळगावकर ब्रँड चा फायदा होऊ शकतो; त्यामुळे उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता!
तालुका आणि जिल्हा म. ए समिती तथा मध्यवर्ती समितीतील महत्वाचे नेते आणि सीमा लढ्यातील लढवये तसेच तालुका समितीचे अध्यक्ष राहिलेले असून, जिल्हा पंचायत सदस्य म्हणून जांबोटीतून निवडून आले होते, तसेच खानापुरातच जुनी को ऑपरेटिव्ह सोसायटी असलेल्या जांबोटी सोसायटीचे संस्थापक- अध्यक्ष आहेत, त्यामुळे जांबोटी भागातील प्रत्येक खेड्यातील घराघरात त्यांचा चांगलाच परिचय असल्याने, बेळगावकर ‘ब्रँड ‘ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे, त्यामुळे त्या ब्रँडचा फायदा समितीला होऊ शकतो, त्यामुळे शिवाजी बेळगावकर यांचा विचार होऊ शकतो, त्यामुळे त्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे.
शिवाजी बेळगावकर यांचे मित्रमंडळ मोठे…
तसेच शिवाजी बेळगावकर यांचे मित्रमंडळ मोठे असल्याने त्याचाही मोठा फायदा निवडणुकीत होवू शकतो, सोसायटी आणि प्लॉटच्या माध्यमातून त्यांचे मित्रमंडळ जांबोटी भाग आणि तालुक्यापर्यंत पसरले आहे, त्यामुळे त्यांची बाजू भर भक्कम दिसते आहे…

संपादक : विलास गोविंद कवठणकर





