मनोरंजन

नागरीकहो ! गायींच्या रक्षणासाठी पुढे या: एमडी सदानंद पाटील


मान येथील क्रिकेट स्पर्धेत नागरिकांना आवाहन; राज्यात 36 लाख गायींच्या रक्षणासाठी नागरिक सह्यांचे भव्य अभियान…

 

मान: लोकहित न्यूज (दौलत कोलीकर)

शेतकऱ्यांसाठी शेतीबरोबर पाळीव प्राणीही महत्वाची संपती असा आतापर्यंतचा समज आणि परंपरा रूढ होतो. त्यामध्ये गायींचे स्थान आधीपासूनच महत्वाचे राहिले असून, आता तर त्याला कायदेशीर बळ मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी गायींच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजेत असे आवाहन जिल्हा भाजप रयत मोर्चा उपाध्यक्ष तथा लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील यांनी केले आहे. आज पारवाड ग्राम पंचायत क्षेत्रातील मान गावामध्ये क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जांबोटी भागाचे भाजप युवा नेते दौलत कोलीकर, पवन गायकवाड यांच्यासह गावकरी व गाव आणि भागातील खेळाडू उपस्थित होते.

पुढे बोलतांना, श्री. पाटील म्हणाले की, 17 डिसेंबरला बंगळूरला गो- सेवा अभियान अर्थात परिषद आयोजित करण्यात आले असून, त्यानिमित्त लाखो गो -रक्षक उपस्थित राहणार आहेत, गाय हा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावा, गायींचे रक्षण झाले पाहिजेत, कतली थांबल्या पाहिजेत या मागण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरणार आहे. राज्यात 36 लाख गायींचे या अभियानांतर्गत रक्षण केले जाणार असून, त्यासाठी लोकसहभाग मोलाचा ठरणार आहे, त्यासाठी फॉर्मच्या माध्यमातून नागरिकांच्या सह्या घेतल्या जात आहेत, याला मोठा प्रतिसाद मिळत आहे . तुम्हीही यामध्ये सहभागी व्हावे असेही त्यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केले.


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *