आनंदवार्ता: अखेर ओलमणीच्या मारुती पवार यांच्या म्हशी गोठ्या’त परतल्या!
खानापूर पोलिसांनी पोहच केल्या म्हशी; पोलिसांच्या यशस्वी कारवाईबद्दल जांबोटी भागातून कौतुकांचा वर्षाव!
ओलमणी : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
शहरात दिवसागणिक होणाऱ्या अनेक चोऱ्या -माऱ्यांचा वेळेत शोध लागणे कठीण असतांनाच, खानापूर पोलिसांनी कमालच करून दाखवली आहे, चार दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या म्हशी लगेच पकडल्या त्याही तेवढ्याच कालावधीत! त्यामुळे अडचणीत आलेल्या मारुती पवार यांना डोंगराएवढा आनंद तर झालाच. पण, तितकेच उत्तम शोधमोहीम कार्य अर्थात कार्यवाही खानापूर पोलिसांनी पार पाडली असून, आजही पोलीस खाते ‘सही हैं! याची प्रचिती जाणवून दिली आहे. पोलिसांच्या या यशस्वी कारवाईचे कौतुक करावे तितके कमीच!
आज परत केल्या म्हशी; शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदच आनंद!
खानापूर पोलिसांनी आज ओलमणी येथील चोरी गेलेल्या मारुती पवार यांच्या म्हशी घटनास्थळी सुखरूप पोहच केल्या. यावेळी जगदीश, सिद्राम, यांच्यासह त्यांच्या तपास मंडळाचे पीआय गवंडी यांनी नेतृत्व केले. पोलिसांच्या यशस्वी कारवाईबद्दल मी त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते मारुती पवार यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.

संपादक : विलास गोविंद कवठणकर





