उद्योगशिक्षण-प्रशिक्षण

कौतुकास्पद; अक्षता किनारी ‘बनली’, जांबोटी भागात पहिली महिला वकील!


जांबोटी भागाच्या अभिमानात मानाचा तुरा; अपार कष्ट करून एक सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी! आई- वडील गुरुजनांचे मोलाचे मार्गदर्शन! नुकताच बंगळूर मध्ये स्वीकारली वकिलीची ‘सनद ‘ !

 

जांबोटी/ बंगळूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

सध्याच्या घडीला सरकारने महिलांना 50 टक्के आरक्षण दिल्याने त्या समाजभिमुख बनल्या खऱ्या पण, तरीही अद्याप काहीं ठिकाणी महिलांना मागे खेचले जाते आहे, तरीही त्याला टक्कर देत संघर्षमय प्रवासाने पुढे येणाऱ्या महिलांची संख्या दिवसागणिक वाढते आहे, त्याचे जिवंत उदाहरण जांबोटीच्या अक्षता प्रमोद किनारीचे देता येईल, अथक प्रयत्न आणि परिश्रम घेऊन अक्षताने जांबोटी भागातील पहिली -वाहिली महिला वकील होण्याचा मान मिळवला असून, पुन्हा जांबोटी भागाचे नाव राज्यात उज्वल झाले आहे, तिला आई वडील आणि गुरुजनांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. ‘लोकहित न्यूज तर्फे अक्षता किनारी हिचे खूप खूप अभिनंदन’!

 

अतिशय खडतर राहिला आहे, अक्षताचा आतापर्यंतचा प्रवास…

नेहमीच जांबोटी पश्चिम भाग मागासलेला म्हणून हिणवले जात असल्याचे तरी, येथील मातीत जे हिरे आहेत, त्यांची गणना होऊनच शकत नाही. सार्वजनिक विकास हा होत असला तरी वैयक्तिक विकास करून घेणे म्हणजे जणू तारेवरची कसरत असते, तेच करून दाखवले आहे, अक्षता प्रमोद किनारी हिने. पुरुषांच्या बरोबरीने महिला सुद्धा आज प्रत्येक क्षेत्रात कार्य करीत आहेत, विशेषता सुविधांनी संपन्न असलेल्या शहरी भागात महिलांचा वर्चस्वा दिसून येतो पण ग्रामीण भागात अजूनही शिक्षण आणि रोजगार याबाबतीत हवा तितका सकारात्मक परिणाम दिसत नाही याची कारणे अनेक असतील. जांबोटी-  कणकुंबीसारख्या दुर्गम परिसरातील मुली आज सुशिक्षित होऊन विविध क्षेत्रात पदार्पण करू लागले आहेत. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कुमारी अक्षता प्रमोद किनारी होय. नुकताच अक्षताने आपले विधी विषयक शिक्षण पूर्ण करून वकिलीची सनद मिळविली आहे . जांबोटी परिसरातील पहिली महिला वकील होण्याचा मान तिने मिळवला आहे त्याबद्दल परिसरात तिचे अभिनंदन होत आहे.

 

अक्षता ही सुप्रसिद्ध पंच कै. रामभाऊ किनारी यांची नात..

जांबोटी येथील सुप्रतिष्ठित पंच कै. रामभाऊ किनारी यांची नात आहे. वडील प्रमोद किनारी हे शेतकरी असून आई स्नेहल किनारी ही गृहिणी आहे. कु. अक्षता ही सुरुवातीपासूनच एक हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. अतिशय कष्टातून शिक्षण पूर्ण करताना आई- वडिलांचे प्रोत्साहन व गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे हे साध्य झाल्याचे ती सांगते. ची प्राथमिक शिक्षण बालिका आदर्श विद्यालय बेळगाव येथे झाले असून बेल्लद लॉ कॉलेज येथून तिने एलएलबी चे शिक्षण घेतले. नुकताच तिला बेंगलोर बार असोसिएशन व उच्च न्यायालय येथून वकिलीची सनद मिळाली आहे. परिसरात तिचे अभिनंदन होत आहे.

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *