सामाजिक

कर्नाटकसह देशातील 12 राज्यात ‘अर्णब’ वादळ अलर्ट’ ; बुधवारी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता!


आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल,तामिळनाडूसह कर्नाटकात बुधवारी अती मुसळधार पावसाचा इशारा! 

 

मुंबई/ चेन्नई: लोकहित न्यूज नेटवर्क 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले. ‘अर्णब ‘ असे निर्माण झालेल्या सदर वादळाला नाव देण्यात आले आहे, बुधवारी कर्नाटकसह देशातील 12 राज्यात अती मुसळधार वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. 27 ऑक्टोंबर आणि 28 ऑक्टोंबर असे दोन मोठ्या पावसाची दाट शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी आंध्र किनारपट्टीवर वादळी पाऊस झडकणार असून, मासेमाऱ्यांनी समुद्रात न जाण्याचा इशारा शासनाने दिला असून, ओडिशा, आंध्र यंत्रणा सज्ज झाली आहे.

बंगळूरमध्ये शनिवारी रात्री पावसाने हजेरी लावली तर दुसऱ्या दिवशी रिमझिम पाऊस सुरूच होता, त्यामुळे सकल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याची आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे, शहराच्या सकल भागात पाणी साचणार असून, वाहतुकीसाठी अडचण निर्माण होते, त्यामुळे सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे.

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *