उद्योग

तालुक्यातील काहीं नेते काँग्रेसच्या वाटेवर: मा. आ. डॉ.अंजली निंबाळकर


कामाला लागा; Zp, TP संदर्भात तालुका काँग्रेसची बैठक पार पडली; तालुका स्तरीय स्क्रिनिंग कमिटी नेमणार!

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

तालुक्यात काँग्रेसचे वारे जोरात असून, त्याच तोडीचे उमेदवार आम्हीं देऊ, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहन करतानाच, काँग्रेसची वाढती ताकद पाहून तालुक्यातील काहीं नेते आमच्या पक्षात येण्याच्या तयारीत आहेत, योग्य वेळ पाहून त्यांचा प्रवेश होईल अशी माहिती, माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी मार्गदर्शन करतांना दिली. आज डॉ. निंबाळकर यांच्या दुर्गानगर येथील रायगड या निवास्थानी पार पडलेल्या तालुका ब्लॉक काँग्रेसच्या बैठकीत दिली. यावेळी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बसवराज सिग्गाव यांनीही यावेळी उपस्थित होते. पुढे, बोलतांना डॉ.निंबाळकर यांनी राज्य सरकारने आभार मानतानाच अधिक महिलांना प्राधान्य देऊन, त्यांना सक्षम केल्याचे सूचित केले. यावेळी अँड ईश्वर घाडी यांच्यासह अनेक कार्यकर्ते,नेत्यांनी आपले विचार मांडले.

 

तालुका स्तरीय स्क्रिनिंग कमिटी नेमणार…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी तसेच निवडणुकीचे नियोजन पाहण्यासाठी स्क्रिनिंग कमिटी स्थापन करण्यात येणार असून, त्यांच्यासमोर इच्छुक उमेदवारांनी अर्ज ठेवायचे आहेत. त्यांनीच योग्य त्या सक्षम उमेदवाराची निवड करतील असेही यावेळी घोषित करण्यात आले.

यावेळी महानतेश राऊत, लक्ष्मण मादार, रियाज पटेल, बेनी पिंटो, कासिम हट्टीहोळी आदी मान्यवर, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते .


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *