क्राईम

निट्टूर-गेणेबैल टोलनाक्याजवळील धाबे बनले दारूचे बार


पोलिस खात्याची डोळेझाक; निट्टूर क्रॉस जवळील मैदान बनले दारू स्पॉट…

 

निट्टूर: लोकहित न्यूज

खानापूरपासून निट्टूर, गणेबैल टोल नाका परिसरातील धाबे जेवणाचे की दारूचे बार बनल्याचे चित्र आहे. येथील धाब्यांवर रात्रीप्रमाणे दिवसाही राजरोस दारू विक्री सुरू आहे, त्यामुळे  महिलांसह तरुणींना आपल्या घरी आणि सदर परिसरात वावरणे धोक्याचे बनले आहे. आम्हीं कशे वावरू,आमच्या जीवाला कोणताही धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल या परिसरातील महिला, तरुणींनी केला आहे. असे असताना खानापूर पोलिस काय करतात? हप्ता मिळतो म्हणून पोलिसांची बोलती बंद झाली की, काय? राजरोस दारू विक्री होत असताना पोलिसांची डोळेझाक का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

निट्टूर क्रॉस जवळील मैदान बनले दारूचा अड्डा; नंगानाच वेगळाच!

खानापूर – बेळगांव मार्गालगत येणाऱ्या निट्टूर क्रॉस जवळील मैदानावर रात्री जणू तळीरामांचा ( दारूड्यांचा) मेळा भरतोय. परिणामी दारू पिऊन बाटल्या फोडणे, नंगानाच करून आजूबाजूच्या महिला आणि तरुणींना त्रास देण्यासारखे प्रकार घडत आल्याचेही स्थानिक सांगतात. परिणामी फोडलेल्या काचेच्या बाटल्यांच्या काचा सकाळी वॉकिंग करणाऱ्यांच्या पायाला लागत आहेत. त्यामुळे एकंदरीत काय तर आजूबाजूच्या धाब्यांवरील दारू विक्रीचे अनेक परिणाम निष्पाप स्थानिक नागरिक महिला आणि तरुणींना भोगावे लागत आहेत.

 

गणेबैल टोल नाक्याजवळील धाब्यांत तर रंगीली पार्टी हॉल!

गणेबैल टोल नाक्याजवळील धाब्यांत तर रंगीली पार्टी हॉल बनल्याचे चित्र आहे. रात्रीप्रमाणे दिवसाही येथील धाब्यांवर पार्ट्याच पार्ट्या होतांना दिसतात. या धाब्यांना दारू विक्रीचा परवाना कोणी दिला पोलिसांनी की, अबकारीने हेच समजणे कठीण झाले आहे. पोलिस आणि अबकारी अधिकाऱ्यांना वेगवेगळे हप्ते पोहचतात असेही ऐकिवात येत आहे.

 

पोलिस म्हणतात कारवाई करू!

  • याबाबत लोकहित न्यूज ने पोलिसांशी संपर्क साधला असता, असे प्रकार आढळल्यास नकीच कारवाई करू अशी माहिती पोलिसांनी  दिली.

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *