पावसाने फिरविली पाठ; हत्तींनी लावली वाट!
कालमणीत बारा दिवसांपासून तीन हत्तींचे ठाण! वनखात्याचे प्रयत्न विफल!
तोंडाला आलेल्या उभ्या पिकांची हत्तींकडून डोळ्यादेखत नुकसान! पण करून हत्तींचा बंदोबस्त करूच- रेंजर तेज वाय.पी!
कालमणी : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
दरवर्षी राज्यातच जास्त पाऊस पडणाऱ्या जांबोटी भागात यंदा पावसाचे प्रमाण अर्धेच राहिले आहे. त्यात ऐन पिके भरात येण्याच्या वेळीच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी अडचणीत आला आहे, त्यात गेल्या बारा दिवसांपासून कालमणी (ता. खानापूर) परिसरातच ठाण मांडून बसलेल्या तीन हत्तींकडून दररोजची नुकसान ठरलेलीच! करावे तरी काय? वनखात्याकडून अनेक प्रयत्न करूनही हत्ती आवरेनाशे झाले आहेत.
भात पिकांसह ऊस, रताळी पिकांची प्रचंड नुकसान; सरकाकडून भरपाईच्या घोषणा पण?..
एरवी वनखाते विभागात रस्त्यासह कोणतेही काळ करायचे म्हटले तर वनखात्याचे अधिकारी कायद्याचा धाक दाखवतात, आता कशे? जंगली प्राण्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड नुकसान केली तर हेच आता मात्र, हाताची घडी घालून शांततेचे ज्ञान देतात. सरकार सांगते भरपाई देतो म्हणून पण, आतापर्यंतचा इतिहास पाहता शेतकऱ्यांच्या नुकसानीइतकी भरपाई कधीच मिळली नाही. त्यामुळे आधीपासून ते आतापर्यंत सरकारने नुसतीच वेळ मारून नेली असे म्हटले तरी वावगे ठरू नये!
तरीही वनखाते म्हणते लवकरच हत्तींचा बंदोबस्त करू!
कालमणीत ठाण मांडलेल्या हत्तींना हुसकावून लावणे तितके सोपे नसेल, तिन्हीही हत्ती पूर्णपणे रागात असून, ते माणसांच्या अंगावर धावून येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका नाकारता येणार नाही! शेतकऱ्यांनी सांभाळून राहणेही गरजेचे बनले आहे. वनखात्याशी संपर्क साधला असता, कोणत्याही परिस्थितीत हत्तींचा बंदोबस्त करूच असे उत्तर रेंजर तेज वाय. पी यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिले.
प्रतिक्रिया –
आधीच पावसाने पाठ फिरवली असताना, त्यात आता हत्तींनी येथेच ठाण मांडून बसल्याने पिकांची नुकसान तर डोळ्यादेखत होत असताना, शेतकऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वेगळी कोणती तरी योजना आखून वनखात्याने हत्तींचा बंदोबस्त करावा एवढीच आमचे मागणी आहे.
–कृष्णा भरणकर, सामाजिक कार्यकर्ते ( शेतकरी) कालमणी !

संपादक : विलास गोविंद कवठणकर





