सामाजिक

मा.आ.डॉ.अंजली निंबाळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ‘प्रॉपर’ प्रयत्नांमुळे ‘चोर्ला’ भाग येणार ‘मोबाईल रेंजव’र!


अखेर अनेक वर्षांपासून या चोर्ला आणि परिसरात मोबाईल टॉवर’ची प्रतीक्षा पूर्ण होणार; प्रत्यक्षात टॉवर उभारणी कामाला सुरूवात, कणकुंबी भागातून कौतुकांचा वर्षाव…

 

चोर्ला: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

भारत देश स्वातंत्र्य झाला पण, खानापूर तालुक्यातील जंगल प्रदेशातील अनेक गावे अद्यापही रस्ते, बससेवा, दूरध्वनी (मोबाईल) सारख्या सेवांपासून दूरच आहेत, याला स्थानिक वनखात्याची अडवणूक मोठी अडचण म्हणून पुढे येत असली तरी नेतृत्व आणि स्थानिकांच्या कमकुवत मानसिकतेमुळे अशा समस्या आजही समस्या’च बनून राहिल्या आहेत, मात्र, असे असतांनाही एआयसीसी सचिव तथा खानापूरच्या माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांच्या पूर्ण ताकदी’मुळे तसेच त्यांचे कट्टर समर्थक दिपक कवठणकर आणि माजी पारवाड ग्राम पंचायत अध्यक्षा प्रियांका गावकर यांच्या अथक पाठपुराव्यालपुढे मोबाईल कंपनीने गुडघे टेकले असून, चोर्ला गावात मोबाईल टॉवर उभारण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे, त्यामुळे चोर्ला आणि आजुबाजूचा परिसर लवकरच इंटरनेटवर येणार आहे, शिवाय या टॉवर’मुळे अनेक समस्यांना पूर्णविराम मिळणार आहे. अती गरजेच्या समस्येची पूर्तता केल्याबद्दल माजी आमदार डॉ. निंबाळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे कणकुंबी भागातून अभिनंदन होत आहे.

 

मोबाईल रेंजअभावी अनेक समस्या; भागच नॉट रिचेबल होता…

आजकाल जग पुरठवू चंद्रावर गेले असतांना खानापूर तालुक्यातील पश्चिम भागातील चोर्ला परिसर मोबाईल नॉट रिचेबल राहिला आहे, मोबाईल रेंजअभावी येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते, परिणामी आजच्या वाटचालीत इंटरनेट सारख्या सेवा मिळत नसल्याने सर्वच कामे गावापासून 12 किमी अंतरावर असणाऱ्या कणकुंबी किंवा 25 किमी अंतरावर असणाऱ्या जांबोटीला येऊन करून घ्यावी लागतात. आजकाल मिनिटात होणारा संपर्क या भागासाठी महिन्याचा होतो, कोणतीच मोबाईल रेंज नसल्यामुळे गावचा संपर्क तुटायचा. माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धडपडीमुळे या सर्व समस्या आता सुटणार आहेत.

 

अपघातांचीही माहिती मिळणे कठीण होते…

गोव्याला जाणारा जवळचा मार्ग म्हणून याच गावच्या ओळखीने चोर्ला मार्ग म्हणून ओळखला जातो, मात्र, हा रस्ता अरुंद असल्यामुळे दिवसा एक ना एक तरी लहान मोठे अपघात ठरलेलेच, त्यामुळे मोबाईल रेंजअभावी त्यांचीही माहिती वेळेत मिळणे कठीण बनले होते. कोणता अपघात केव्हां आणि कुठे झाला याची माहिती मिळणे फारच अवघड होऊन बसले होते, चोर्ला येथे मोबाईल टॉवर होत असल्याने बऱ्यापैकी ही समस्याही दूर होणार आहे…

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *