राजकीय

आमटे कृषी पत्तीन द्वंद! अर्ज भरणा सुरू; आज 3 पर्यंत चित्र स्पष्ट होणार!


गुपित राजकीय डाव पाहता, निवडणूक होण्याची शक्यता; लक्ष्मण कसर्लेकर ग्रुपची जोरदार तयारी, अरविंद पाटील गट कोणती खेळी खेळणार ? एकच चर्चा!

 

जांबोटी/आमटे : लोकहित न्यूज -विलास कवठणकर )

   -(सहकार राजकारण) –

सध्याच्या घडीला जांबोटी भागात एकच चर्चा आमटे कृषी पत्तीन इलेक्शन! अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे, सध्या (आज) अर्ज भरणा सुरू आहे, आज 3 पर्यंत कोण राहणार, कोण माघार घेणार, इलेक्शन होणार की, कोणाची एक बाजू वरचढ होवून बिनविरोध होणार हेही आजच सायंकाळपर्यंत कळेल! गेल्या आठवड्यापासून सत्ताधारी लक्ष्मण कसर्लेकर गटाची जोरदार सलामी सुरू असून , मिटिंगावर मिटिंगा ठिकठिकाणी होतांना दिसल्या आहेत, कालही लक्ष्मण कसर्लेकर यांच्या वनदेवी या सोसायटी हॉलमध्ये त्यांच्या ग्रुपची तासांहून अधिक काळ मीटिंग झाली. यावर कसर्लेकर यांच्याशी लोकहित न्यूज ने संपर्क साधला असता, आमची तयारी पूर्ण झाली असून, फक्त शासकीय फॉर्म्युलिटी झाली की, आमचा विजय निश्चित असल्याचे असल्याचे त्यांनी अगदी धाडसाने बोलून दाखवले!

 

लक्ष्मण कसर्लेकर यांचे जुनेच पैलवान मैदानात राहण्याची शक्यता…

काल जांबोटीत झालेल्या मीटिंगमध्ये जुनेच लोक हजर होते, त्यांनी याआधी पदे भोगली आहेत, त्यात आश्चर्याची बाब म्हणजे नवीन चेहरा दिसला नाही, त्यामुळे लक्ष्मण कसर्लेकर ग्रुपमध्ये जुनेच पैलवान पुन्हा मैदानात राहण्याची दाट शक्यता आहे…

 

अरविंद पाटील; मी पुन्हा येईन पुन्हा येईन का?

तालुक्यात पक्के राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आमदार अरविंद पाटील यांच्याबाबत अदृश्य चित्र दिसत असले, तरी मी पुन्हा येईन, पुन्हा येईन’ची शक्यता अजिबाज नाकारता येत नाही, यावेळी एक पाऊल मागे घेत वाघाप्रमाणे मोठी झेप घेणार की, ‘सबकूच लक्ष्मण के हात’  देऊन गप्प बसणार अश्याच शक्यता ‘पाटील’ यांच्या बाबतीत वर्तविल्या जात आहेत…

    

    


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *