आरोग्यउद्योग

कलियुगातील देवरूपी वैद्यांकडून ‘समाज’ दिशादर्शकां’चा सन्मान!


खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन’कडून तालुक्यातील संपादक -पत्रकारांच्या कार्याची दखल घेत, भव्य कार्यक्रमातून सत्कार; उपस्थित संपादक -पत्रकारांडूनही सर्व डॉक्टरांचे आभार!

 

खानापूर:लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

सध्याच्या युगातील समाजाचे मुख्य दोन घटक एकत्र आले की, समाजाच्या सुधारणेला कधीच विलंब होणार नाही, डॉक्टर, पत्रकार आणि वकील या अंगामुळे समाजाची मुख्य चाके चालतात. कलियुगातील देवरूपी वैद्य अशी उपमा डॉक्टरांना दिला तरी वावगे ठरू नये, कारण , काहीवेळी पूणर्पणे यमदूतांच्या हातून एखाद्याचे प्राण काढून घेण्याची धमक डॉक्टरांमध्ये असते, याला याआधीच्या अनेक घटना साक्ष देतात. तर आजच्या समाजाचा दुसरा कणा म्हणून पत्रकार अर्थात समाजसुधारक वा दिशादर्शक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, आणि खरोखरच सध्याच्या घडीला सरकारी यंत्रणा, राजकीय वर्तुळ आणि सामान्य जनतेतील महत्वाचा दुवा म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते आणि खरेही आहे, असे प्रतिपादन खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट आय.आर.घाडी यांनी मांडले. तालुका डॉक्टर्स असोसिएशन’कडून खानापुरातील वेबपोर्टल संपादक आणि दैनिकांच्या पत्रकारांचा सत्कार समारंभ बुधवारी रात्री खानापुरात पार पडला त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. डी. ई. नाडगौडा यांनी होते.

व्यासपीठावर खानापूर लाईव्हचे संपादक पिराजी कुऱ्हाडे, पुढारीचे तालुका प्रतिनिधी वासुदेव चौगुले, प्रजावाणीचे तालुका प्रतिनिधी प्रसन्ना कुलकर्णी, सकाळचे संदीप सुतार, तरुण भारतचे आप्पाजी पाटील- विवेक गिरी, संदेश न्यूजचे संपादक सुहास पाटील, सकाळचे हणमंत गुरव, लोकहित न्यूजचे संपादक विलास कवठणकर, डॉ. कदम सर ,डॉ. सुनील पाटील, डॉ. सुळकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना ॲड. ईश्वर घाडी यांनी कोरोना काळातील डॉक्टर आणि पत्रकार यांच्या पुण्य कार्याच्या माणुसकीच्या रूपाचे कोडकौतुक करतांनाच, आजही या दोन्हीं शक्ती एकत्र आल्याने समाजाला आरोग्यदायी सेवा आणि योग्य ती दिशा नक्कीच मिळेल, त्यात कायद्याचा मार्ग आम्हीं वकील म्हणून सुखकर करू अशी हमी देत खानापूरातील सर्व जेष्ठ आणि तरुण डॉक्टरांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले.

पिराजी कुऱ्हाडे म्हणाले की, फक्त सत्कार करून चालणार नाही तर आरोग्य सेवेबरोबर शिक्षणाचा विकासही आपण सर्वांनी करुन घेतला पाहिजेत, एकादी शाळा काढून त्यामध्ये सर्व भाषांचे वर्ग सुरू करत,सर्व भाषांना समान आधार देत त्याचा गोर गरीब जनतेला कसा फायदा होईल याकडे लक्ष दिले पाहिजेत, ते कार्य तुम्हीं आणि आम्हीं मिळून करू या! आमच्याकडून तुम्हांला कोणतेही सहकार्य अथवा मदत लागल्यास नक्कीच आठवण करावी अशी हमी तमाम पत्रकारांच्यावतीने देतो असे, त्यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी बोलतांना वासुदेव चौगुले यांनी सांगितले की, खानापुरातील डॉक्टर आणि पत्रकार यांचे खूप जुने ऋणानुबंध प्रेमाच्या घट्ट धाग्याने बांधले गेल्याने ते सुटणे कठीण असे हे नाते आहे, ते आपण जपत मागासलेल्या समाजाला समृद्ध करण्याचा सर्वांनी प्रयत्न करू या, तुम्हीं केलेला आमचा सन्मान हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, त्याचे आम्हीं कायम स्मरण ठेवू असेही ते म्हणाले. यावेळी विवेक गिरी यांनीही आपले विचार मांडले..

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ डी. ई. नाडगौडा यांनी सर्वांचे स्वागत करतानाच, आमच्या शब्दाला मान देऊन तुम्हीं उपस्थित झालात याबद्दल तुम्हा सर्व पत्रकारांचे आभार मानतो, असेच तुमचे आमच्यावर अपार प्रेम असुदे, असे सांगतानाच, सर्व डॉक्टरांचेही स्वागत केले.

 

खानापूरातील डॉक्टर बनले समाजसुधारक....

एकीकडे तालुका सरकारी आरोग्य यंत्रणा सलाईनवर असतांना, खानापूर तालुक्यातील जांबोटी, बिडी, गर्लगुंजी , नंदगडसह भागात कार्यरत असणाऱ्या खासगी डॉक्टरांनी आरोग्य सेवेबरोबर सामाज सुधारणेचेही ‘व्रत ‘ हाती घेतले असून, लाखो गोरगरीब जनतेला त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, अलिकडच्या पाच वर्षात बाहेरच्या तालुक्यात सेवा घेणाऱ्या खानापूरातील रुग्णांची संख्या पूर्णपणे कमी झाली आहे, अशी सेवा विशेषकरून तालुक्यातील खासगी डॉक्टरांकडून दिली जात आहे, असे दिलासादायक चित्र सध्या दिसते आहे. त्याचबरोबर समाजातील गरजू रुग्णांना मोठे सहकार्य डॉक्टरांकडून मिळत आहे, असे नागरिक सांगतात. त्याबरोबर गोरगरीब जनतेच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना मदत त्यांना मदत करण्याचेही समाजकार्य डॉक्टरांकडून केले जात आहे, त्यामुळेच डॉक्टरही समाजसुधारक बनल्याचे सुंदर चित्र तालुक्यात दिसत आहे, अशा उत्तम कार्याबद्दल तालुक्यातील तमाम जनतेतून कौतुक  केले जात आहे…

या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन डॉ. शंकर पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. वैभव पाटील यांनी केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ सल्लागार डॉ. सुनील पाटील, डॉ. सुदर्शन शृंगार, डॉ. गुंजीकर, डॉ. एन. एल. कदम, डॉ. पी. एन. पाटील, डॉ. वैभव बाल्केकर, डॉ. सागर चिट्टी, उपाध्यक्ष डॉ. मदन कुंभार, सचिव डॉ. सागर नार्वेकर आणि खजिनदार डॉ. किरण लाड यांनी आभार मानले..

यावेळी जांबोटी भागाचे युवा भाजप नेते दौलत कोलीकर- सचिन साबळे – कृष्णा भरणकर, डॉ. दर्गा, डॉ. मनोज पाटील, डॉ. विशाल पाटील, डॉ. आनंद चिठ्ठी, माजी पंचायत सदस्य तालुका उपाध्यक्ष विनायक मुतगेकर, दत्ता मोरे तसेच तालुक्यातील तमाम डॉक्टर यावेळी उपस्थित होते.

 

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *