राज्यसरकारचे धोरण म्हणजे! एका बाजूने देणे अन् दुसऱ्या बाजूने डबल वसूल करणे!
आमदार विठ्ठल हलगेकर यांचा काँग्रेस सरकारवर घाणाघात; तालुका भाजपच्यावतीने वाढत्या महागाई विरोधात खानापुरात मोर्चा
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
पाच हमी योजना फ्री -फ्री म्हणून राज्यातील काँग्रेस सरकार एका बाजूने देत आहे, तर दुसऱ्या बाजूने डबल वसूल करत आहे, सध्याच्या वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता मोठ्या संकटात सापडली आहे. कडधान्य, पेट्रोल, गॅससह सर्वच संसारउपयोगी वस्तूंचा दर गगनाला भिडले आहेत, असे असताना राज्य सरकार कोणत्याच उपाययोजना करण्याच्या मनस्थितीत दिशेनाशे झाले आहे. तात्काळ वाढलेली दर मागे घेऊन जनतेला सहकार्य करावे अशी मागणी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केली. तालुका भाजपच्यावतीने खानापुरात आज राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. पहिल्यांदा शहरात मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुका भाजप अध्यक्ष बसवराज सानिकोप, राज्य भाजप कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी, जिल्हा भाजप उपाध्यक्ष संजय कुबल, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई, माजी जांबोटी ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनील देसाई, भाजपा युवा नेते पंडित ओगले, तालुका भाजपा प्रधान सचिव मल्लापा मारिहाळ, विशाल पाटील आदी नेते व मान्यवर उपस्थित होते.

संपादक : विलास गोविंद कवठणकर





