क्रिकेटचा ‘हब्ब’ हब्बनहट्टी संघ ठरला, कुसमळी लीग’चा लाखाचा मानक’री !
आमदार विठ्ठल हलगेकर पुरस्कृत क्रिकेट स्पर्धा; अनेक संघांनी भाग घेतला होता…
जांबोटी/ हब्बनहट्टी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
अती उत्साहित गाव म्हणून हब्बनहट्टी असे नाव पडले असणार असा अंदाज लावला तर तो खोटा ठरू नये, कारण ‘ हब्ब’ हा शब्द कन्नड शब्द असून, उत्सव वा सण असा त्याचा मराठी अर्थ होतो! याच शब्दावरून हब्बनहट्टी गावचे नाव पडले असावे, त्याच गावात अलीकडे आणखी एका जागतिक लेवलच्या हब्ब’ ला सुरुवात झाली आहे, ती म्हणजे क्रिकेट’ची ! आजही वयाने चाळीशी पलिकडील युवकही, सध्याच्या तरण्यांना पुढे सोडत नाहीत. त्याच जोरावर रविवारी कुसमळीत (ता. खानापूर) पार पडलेल्या आमदार चषक लीगमध्ये कमालीचा खेळ करत पहिले बक्षीस मिळवत, एक लाखांचा मानकरी होण्याचा ‘मान’ तालुक्यात मिळविला आहे. तर हब्बनहट्टी गावात विजयी संघाचे जंगी स्वागत करण्यात आले.
सुंदर खेळ करत शेवटच्या अती -तटीच्या सामन्यात जोरदार बाजी मारली….
आधीपासूनच अती हुशारीने खेळ करत आलेल्या हब्बनहट्टी हनुमान युवक संघाची शेवटची ‘ गाठ ‘, यजमान कुसमळी संघाशी पडली. त्याही सामन्यात हब्बनहट्टी संघाने सुंदर खेळी साकारत जणू संपूर्ण ग्राउडच आपल्या कब्जात घेत जोरदार बाजी मारली. यामध्ये संघातील प्रत्येक खेळाडूंनी स्वतःतील वेगवेगळी कला जीव तोडून ओतली होती, संघमालक- शांताराम गावडे यांनीही खेळाडूंना चांगलेच प्रोत्साहित केले. लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकर गावडे, प्रभाकर शेंगाळे, नानू गावडे, परशुराम गावडे, पवन गायकवाड, संघाचे मुख्य खेळाडू नागेंद्र गावडे, पुंडलिक गावडे, शाहू गावडे कृष्णा सुतार यांच्यासह सर्व खेळाडू उपस्थित होते.

संपादक : विलास गोविंद कवठणकर





