उद्योगसामाजिक

जांबोटी रस्ता समस्या भाग – 1 सातेरी देवी मंदिर ते राजवाडा रस्त्याची सहा महिन्यात दुर्दशा!


तात्कालीन विधान परिषद सद्स्य महंतेश केवठगीमठ यांच्या 10 लाखांचा फंड गेला कुठे? याची चौकशी व्हावी नागरिकांची मागणी…

 

जांबोटी:; लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

विकास हाच आमचा अजेंडा असा नारा गेल्या 2014 पासून भाजप सरकारच्यावतीने देशभर ऐकू येतो आहे, मात्र, भाजपच्याच विधान परिषद सदस्यांच्या 10 लाखांचा निधी वाया गेला अशी बातमी समोर आली तर , करायचे काय? असाच प्रकार जांबोटी राजवाडा गावात झाला आहे. येथील सातेरी देवी मंदिर ते राजवाडा ( जांबोटी) रस्त्याचे सहा महिन्यापूर्वी काँक्रीटीकरण झाले होते, मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अवघ्या सहा महिन्यातच या रस्त्याची दुर्दशा झाली असून, या रस्त्यावरील पूर्ण खडी बाहेर पडली आहे. त्यामुळे या रस्त्याचा दर्जा बाहेर पडला असून , स्फोट 6या रस्त्याने चालत जाणेही धोक्याचे बनले आहे. त्यामुळे हा रस्ता कुणी केला याचा शोध उद्याच्या भागात घेण्यात येईल, पण, संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांतून केली जात असल्याचे.

 

(उद्याच्या भागात सविस्तर माहिती प्रसिद्ध करू)

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *